26.9 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeMaharashtraठरलं! राज्यात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ ला मतमोजणी

ठरलं! राज्यात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ ला मतमोजणी

आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचीही घोषणा केली.

सारा महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ती विधानसभेची निवडणूक अखेर मंगळवारी जाहीर झाली असून राज्यातील सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघात एकाच दिवशी मतदान घेण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होईल आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता देखील तत्काळ लागू झाली आहे. निवडणुका जाहीर होताच सर्वांनीच त्याचे स्वागत केले असून राजकीय पक्षांची लगीनघाई सुरु झाली आहे.

मंगळवारी दुपारी ३.३० वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये घेतलेलया पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी तारखांची घोषणा केली. महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा निवडणुकीचीही घोषणा करण्यात आली असून नक्षलप्रभावित असे हे राज्य असल्याने तेथे २ टप्प्यात १३ आणि २० नोव्हेंबर असे मतदांन होईल. मतमोजणी महाराष्ट्रासोबतच २३ नोव्हेंबरला होणार आहे.

आचारसंहिता लागू – महाराष्ट्रात एकूण ६ प्रमुख पक्षांच्या दोन स्वतंत्र आघाड्या असून प्रामुख्याने या दोन आघाड्यांमध्येच मुख्य मुकाबला होईल असा अंदाज आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासोबत आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचीही घोषणा केली.

२६ नोव्हेंबरची डेडलाईन – निवडणूक आयोगाला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या २६ नोव्हेंबर २०२४ पूर्वी निवडणुका घेणं बंधनकारक होते. कारण २६ नोव्हेंबरपर्यंत विद्यमान विधानसभेची मुदत आहे. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरला मतदान घेण्याची घोषणा आयोगाने केली असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. पुढील २ दिवसात निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईल.

घरातून मतदान करण्याची व्यवस्था – मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काही दिवसांपूर्वी आम्ही महाराष्ट्राचा दौरा केला होता. निवडणुकीच्या तयारीचा आढावा या दौऱ्यात घेतला. लोकसभा निवडणुकीच्यावेळी ज्याकाही गोष्टी घडल्या त्या टाळण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करत आहोत. मतदान केंद्रावर रांगा लागत असतात. केंद्रावरील गर्दी लक्षात घेवून बाक किंवा खुर्त्यांची व्यवस्था करण्याच्या सुचना आम्ही दिल्या आहेत. ८५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांना घरातून मतदान करता येणार आहे. या मतदारांच्या मतदानाची गोपनियता कायम राहिल त्याची पुर्ण व्यवस्था आम्ही केली आहे असे आयुक्तांनी सांगितले.

प्रचार तोफा कधी थंडावणार? – निवडणुका या येत्या महिना भरात पार पडणार असल्याने राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी खूप वेळ शिल्लक आहे. १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावतील.

कांटे की टक्कर – शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे, सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणूक निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. ठाकरेंची साथ सोडून शिंदेंनी शिवसेना मिळवली, तर अजित पवारांनी राष्ट्रवादी आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांना जनता किती साथ देते पाहावं लागेल. तर, दुसरीकडे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जादू लोकसभेप्रमराणे पुन्हा कमाल करणार का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular