24.7 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeChiplunचिपळूण नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीत इच्छुकांना दिलासा

चिपळूण नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीत इच्छुकांना दिलासा

नगरपरिषदेत नगराध्यक्षपद सर्वांसाठी खुले झाल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.

तब्बल ९ वर्षानंतर होणाऱ्या नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या आरक्षण सोडतीत चिपळुणात सर्व इच्छुकांना दिलासा मिळाला. बहुतांशी इच्छूक उमेदवारांच्या मनासारखे आरक्षण पडल्याने सारेजण सुखावले आहेत. विशेष म्हणजे महिलांसाठी ५० टक्के आरक्षणप्रमाणे २८ पैकी १४ जागा राखीव असताना सर्वसाधरण मध्येही त्यांना मोठी संधी मिळणार असल्याने या निवडणुकीत महिलाराज वर्चस्व राखणार, हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चिपळूण नगरपरिषदेत नगराध्यक्षपद सर्वांसाठी खुले झाल्याने राजकारण ढवळून निघाले आहे. या पदासाठी इच्छूक असलेल्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण सोडतीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उपस्थित बुधवारी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात ही आरक्षण सोडत निघाली.

ओबीसी राखीव ८ जागा – ८ या सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा निश्चीत केल्या. यातील ४ जागा म हिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. सर्वसाधारण महिलांसाठी ९ जागा, सर्वसाधारणसाठी १० आणि अनुसुचीत जाती महिलांसाठी १ जागा जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे प्रभाग १ (गोवळकोट) मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग २ (गोवळकोट रोड) मध्ये नामाप्र महिला व सर्वसाधारण, प्रभाग ३ (पेठमाप) नामाप्र महिला व सर्वसाधारण, प्रभाग ४ (उक्ताड) नामाप्र व सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ (वाणीआळी) नाम प्र व सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ (मुरादपूर शंकरवाडी) नामाप्र महिला व सर्वसाधारण, प्रभाग ७ (मार्कंडी) नामाप्र व सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ (काविळतळी वांगडे मोहल्ला ) सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग ९ (राधाकृष्णनगर) सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग १० ( रॉयलनगर) नामाप्र महिला व सर्वसाधारण, प्रभाग ११ (खंड बाजारपेठ) अनुसुचीत जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग १२ (पागमळा विरेश्वर कॉलनी) सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग १३ (रावतळे ओझरवाडी) नामाप्र व सर्वसाधारण म हिला, प्रभाग १४ (पाग) सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे.

अनेकांना दिलासा – या आरक्षण सोड़तीत माजी नगरसेवकांसह नव्याने इच्छूक असलेल्या उमेदवारांनाही संधी चालून आली आहे. शहरातील प्रभाग ४ मधील उक्ताड येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने माजी स्विकृत नगरसेवक परिमल भोसले यांची संधी काहीशी हुकली आहे. तसेच नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेले शिंदे सेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या रावतळे ओझरवाडी परिसरातील प्रभाग १३ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने त्यांचीही नगरसेवक पदासाठी संधी हुकली आहे. याचपद्धतीने माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या पारंपारिक खंड बाजारपेठ प्रभागात अनुसुचीत जाती महिला आरक्षण पडले आहे. यापुर्वी येथे अनुसुचीत जाती आरक्षण पडले होते. मात्र याच प्रभागात सर्वसाधारण आरक्षण पडल्याने त्यांच्यासह इतर इच्छुकांना संधी मिळणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular