22.2 C
Ratnagiri
Saturday, January 24, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरीत एप्रिलपासून होणार पाण्याची कपात

रत्नागिरीत एप्रिलपासून होणार पाण्याची कपात

एप्रिलपासून प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट साठा आहे; परंतु वाढता उष्मा आणि भविष्यात १५ जूनपर्यंत शहरवासीयांना टंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. एप्रिलपासून पाणी कपातीला सुरुवात केली जाईल. ३० मार्चला गुढीपाडवा आणि ३१ ला ईद असल्याने एप्रिलपासून दर सोमवारी कपातीला सुरुवात केली जाणार आहे. पालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला. शीळ धरणात पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीसाठा पुरणारा असला तरी उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने शिमगा संपल्यानंतर म्हणजेच रंगपंचमीनंतर प्रत्येक सोमवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत विचार सुरू झाला आहे. शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.६६६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाळासुद्धा लांबणीवर पडण्याची हवामान खात्याने भीती व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात १.६५ दशलक्ष घनमीटर साठा असताना आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला होता.

त्यानंतर एप्रिलपासून पावसाळा सुरू होईपर्यंत प्रत्येक सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. हा पाणीपुरवठाः समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ४ जुलैपासून नियमितः करण्यात आला होता. शीळ धरणातील साठ्याच्या पाहणीनुसार २.०५१ दशलक्ष घनमीटर पाणी असल्याचे पातळीची मोजमापः करणाऱ्या पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात येत आहे. रत्नागिरी शहरात सुमारे ११ हजार नळजोडण्या आहेत. धरणातील सध्याचा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणारा आहे; परंतु सध्या कडाक्याच्या उन्हामुळे धरणातील साठ्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पाणीसाठा कमी होण्याची शक्यता असते.

पालिकेच्या पाणी विभागाने पाणीपुरवठा व्यवस्था प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीकरिता बाष्पीभवनाचा धोका ओळखून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. २४ मार्चपासून आठवड्यातील प्रत्येक सोमवारी पाणी कपात करण्यात येणार होती; परंतु गुढीपाडवा आणि ईद सणांचा विचार करून पालिकेने हे नियोजन पुढे ढकलले आहे. एप्रिलपासून प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular