27.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeChiplunपरशुराम घाटातील पाणी शिरले घरात पावसामुळे फटका - यलो अलर्ट

परशुराम घाटातील पाणी शिरले घरात पावसामुळे फटका – यलो अलर्ट

चिपळूण तालुक्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

जिल्ह्यात पाऊस पडत असल्यामुळे भातशेतीला पोषक परिस्थिती आहे. चिपळूण तालुक्यात मागील दोन दिवसांत पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावर परशुराम घाटातील मातीचे पाणी घरात शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार असून, हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. चिंचघरीत घराच्या भिंती तर कामथे येथे सार्वजनिक विहीर कोसळली असून, परशुराममध्ये जुनाट पिंपळ वृक्ष दुकानावर कोसळून नुकसान झाले आहे.

याबाबत महसूल कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले आहेत. पावसाने मंगळवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार आगमन केले. यातूनच ठिकठिकाणी पाणी साचल्याचा प्रकार घडला होता. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात मातीचा भराव केल्याने अभय सहस्त्रबुद्धे यांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले. वादळी पावसात श्री क्षेत्र परशुराम मंदिरानजीक असलेला सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा जुना पिंपळ वृक्ष कोसळून त्याखाली असलेल्या ऋतुजा गणपुले यांच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी महसूल खात्यांमार्फत या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. चिंचघरी येथे पावसामुळे घराच्या भिंती कोसळून नुकसान झाल्याची नोंद तहसीलच्या नियंत्रण कक्षात करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular