नैसर्गिक उताराने शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या ११०० मीटरच्या पाईपलाईनचे काम ३ वर्षे झाली रखडले आहे. आतापर्यंत ४९९ मीटरचे पाईप टाकुन झाले आहेत, अजून ६११ मीटरएवढा पाईप टाकणे बाकी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अहवालामध्ये हे स्पष्ट केले आहे. सुधारित पाणी योजनेचा हा एक भाग आहे. लांबलेल्या या कामामुळे निर्माण करण्यात आलेल्या फ्लोटिंग जेटीच्या पंपाद्वारे पाणी जॅकवेलमध्ये सोडले जात आहे. यामुळे पालिकेवर महिन्याला २ लाखांचा भुर्दंड बसत आहे. रखडलेले हे काम झाले असते तर आज फ्लोटिंग जेटीच्या वीज बिलाचा भार कमी झाला असता. शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे शहरातील पाणी प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून फ्लोटिंग पंप बसविण्यात आले सुधारित पाणी योजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे ११०० मीटरची पाईपलाईनचा समावेश आहे. परंतु ३ वर्षे झाली तरी ही पाईपलाईन टाकण्याच्या दृष्टीने अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत.
पावसाळ्यात पूर स्थिती निर्माण झाली तर शोळ नदीवरील फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते. तसे झाले तर ऐन पावसाळ्यात शहराचा याणी प्रश्र निर्माण होणार आहे. यामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शीळ धरण ते बँकवलेपर्यंत नैसर्गिक उताराने पाणी येते. पालिकेने सुमारे साडे ११०० मीटरची ही पाईपलाइन वेळीच टाकली असती तर पालिकेच अर्थात भुर्दंड बसला नसता. सहा फ्लोटिंग पंप नदीवर बसवून ते पाणी जॅकवेलमध्ये टाकले जाते. यासाठी सहापैकी ४ पंप २४ तास सुरू असतात. तर दोन पंप पर्यायी म्हणून ठेवलेले असतात. या विद्युत पंपांचे महिन्याचे वीज बील सुमारे २ लाख आहे. गेली तीन वर्षे हे पंप सुरू आहेत. म्हणजे साधारण पाऊण कोटी आतापर्यंत पालिकेने बिलापोटी मोजले आहेत.
पाईपलाईन टाकली असती हे जनतेचे पैसे वाचले असते. परंतु यामध्ये कोणालाही रस नाही आणि कोणाची मानसिकताही नसल्याचे दिसते. साधरण ३ वर्षे व्हायला आली तर ११०० मीटरपैकी आतापर्यंत ४९९ मीटरचे पाईप टाकुन झाले आहेत. उर्वरित ६११ मोटरचे काम शिल्लक आहे. त्याला अजूनही मुहुर्त मिळालेला नाही. हे काम अपूर्ण असल्याने फ्लोटिंग जेटीचे पंप सुरू आहे. पंप सुरू असल्याने ङ्गविद्युत बिलाचा बोजा पालिकेवर पडतच आहे. त्यामुळे जनतेचे नाहक वाया जाणारे हे पैसे वाचण्यासाठी पालिकेने या वर्षी तरी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

