25.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriजलशुद्धीकरण केंद्र एकमेकांना जोडणार, आजपासून नियमित पाणी

जलशुद्धीकरण केंद्र एकमेकांना जोडणार, आजपासून नियमित पाणी

१० मीटर पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू आहे.

शहरवासीयांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये शुद्ध पाणी देण्याच्या दृष्टीने पालिकेने साळवी स्टॉप आणि नाचणे जलशुद्धीकरण केंद्र एकमेकाला जोडण्याचे नियोजन केले आहे. त्याचे काम सुरू असल्याने सोमवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. १० मीटर पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू आहे. या कामाला अवधी लागणार असल्याने उद्यापासून शहराला नियमित पाणीपुरवठा करून हे काम सुरू ठेवले जाणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणावरच जॅकवेल कोसळल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. अनेक भागाला पाणीपुरवठा झालाच नाही.

पर्यायी व्यवस्था नसल्याने रत्नागिरी शहर ऐन गणेशोत्सवात पाण्यापासून वंचित राहिले. अशीच अवस्था जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्यानंतर होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. शहरातील साळवी स्टॉप जलशुद्धीकरण हे एकच केंद्र सुरू आहे. याठिकाणी बिघाड झाल्यास शहराचा पाणी पुरवठा खंडित होण्याची भीती असते. त्यामुळे नाचणे येथील दुसरे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. नाचणे जलशुद्धीकरण केंद्र मुख्य जलवाहिनीला जोडल्यानंतर साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बिघाड झाल्यास नाचणे जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे आणि साळवी स्टॉपला काही अडचणी आली तर नाचणे केंद्रातून पाणीपुरवठा करता येणार आहे.

नवीन पाणी योजनेंतर्गत या जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू झाले आहे. याचठिकाणी मुख्य जलवाहिनीवरून पाणी नेण्यासाठी नवीन ११०० मीटची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. आता नाचणे येथे १० मीटरचे काम शिल्लक आहे. ते पूर्ण करण्यासाठी आजचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. परंतु, हे काम एका दिवसाचे नसल्याने उद्यापासून नियमित पाणीपुरवठा करून हे काम सुरू ठेवले जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular