26.7 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeChiplunचिपळूणला जोरदार पावसाचा तडाखा महामार्गालगतच्या घरात शिरले पाणी

चिपळूणला जोरदार पावसाचा तडाखा महामार्गालगतच्या घरात शिरले पाणी

मुंबई-गोवा महाम ार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

मान्सूनपूर्व पावसाने चिपळुणात दाणादाण उडवून दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालयासह शिवाजीनगर बस स्थानकाजवळ रस्त्यावर पाणी साचले आणि काही घरांतही शिरले. या पार्श्वभूमीवर पालिकेचा स्वच्छता व आरोग्यविभाग सतर्क झाला असून, पावसाचे पाणी साचू नये, यासाठी ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. चिपळुणात गेले ३ दिवस वळवाच्या पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी ११ वाजता पॉवर हाऊस चौक येथे उम`श सकपाळ, शशिकांत मोदी, विनोद भोबसकर, सुयोग चव्हाण, संजय तांबडे, रामदास राणे आदी कार्यकर्ते मंडळी एकत्र येऊन हायवे अधिकारी खुणेकर, तसेच ठेकेदार प्रतिनिधी याना, पॉवर चौक येथे आणखी किती अपघात झाले, मूत्यू झाले की आपण स्पीड ब्रेकर्स घालणार, नामदार उदय सामंत यांनी ३ मे रोजी आदेश देऊनही आपण काम चालढकल करीत आहात.

भर चौकात पावसाचे पाणी तुंबले आहे, त्याचा निचरा केलेला नाही, सिग्नल यंत्रणा नाही, वीज प्रकाश पुरेसा नाही, याबाबत आपले खाते जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. आम्ही आता फक्त ८ दिवसांची मुदत देत आहोत, त्या कालावधीत काम पूर्ण करावे, अन्यथा आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत असा सज्जड इशारा दिला आहे. दरम्यान सतत पावसाची संततधार सुरू राहिली असून संपूर्ण चिपळूण जणू जलमय झाले आहे. मुंबई-गोवा महाम ार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यातून मार्ग काढत वाहतूक सुरू आहे. तसेच शहरातदेखील जागोजागी पाणी साचण्याचे प्रकार झाले. परंतु नगरपरिषदेने आपले कर्मचारी काम ाला लावले असून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्याधिकारी विशाल भोसले, तसेच प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर स्वतः लक्ष देऊन काम करून घेत आहेत. सकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत सलग सुरू राहिल्याने चिपळूण शहरासह ग्रामीण भागाचे जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे.

आंबा पीक गेले, पेरणीची चिंता – हा अवकाळी आहे की मान्सून सुरू झाला, या बाबत शेतकरी आणि आंबा बागायतदार प्रचंड धास्तावले आहेत. या पावसाने आंबा पिकाचे तर जबरदस्त नुकसान केले आहे. परंतु दोन दिवसांवर भात पेरणीचा हंगाम सुरू होत आहे. अशा परिस्थितीत जर पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र पेरणीचा हंगाम देखील निघून जाईल आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular