25.3 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeRatnagiriसप्तलिंगी नदीवरचा जलपर्यटनाचा प्रयोग यशस्वी

सप्तलिंगी नदीवरचा जलपर्यटनाचा प्रयोग यशस्वी

सोमवारी प्रायोगिक तत्वावर फुणगुस येथून फायबरची मोटर बोट आणण्यात आली होती.

रत्नागिरी जिल्ह्याला नदी, समुद्र अशी नैसर्गिक वरदान लाभलेली आहे. त्यामुळे या वरदानाचा लाभ घेण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्याचे योजिले आहे. जल पर्यटनाला चालना मिळण्यासाठी संबंधित उपक्रमासाठी प्रयोजन करण्यात आले आहे.

नगरपंचायत देवरूख यांनी शाळा नं. १ समोर सप्तलिंगी नदीवर घातलेल्या बंधाऱ्यामुळे नदीचे पाणी अडवले गेले आहे. एव्हाना पूर्ण कोरडं दिसणारे नदीचे पात्र यावर्षी पावसाळ्यापेक्षाही जास्त पाण्याने भरले आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत देखील वाढ करण्याचा उद्देश यशस्वी झाला आहे. त्यासोबतच नदी पात्रातील या पाण्यावर छोट्या फायबर बोटी सोडून त्यातून नागरिकांना फेरी बोटींचा आनंद देता येईल का? याची आपण चाचपणी करणार आली.

यासाठी सोमवारी प्रायोगिक तत्वावर फुणगुस येथून फायबरची मोटर बोट आणण्यात आली होती. हा जलपर्यटनाचा प्रयोग यशस्वी झाला असून येथे जल पर्यटनस्थळ विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला. नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. यावर सर्व बाजूंचा विचार करून असणाऱ्या त्रुटी दूर करून गतवर्षीपासून हे स्थळ सुरू करण्याचा मानस नगर पंचायतीने व्यक्त केला आहे. जल पर्यटनाबरोबरच यात मासे निर्माण करणे, तसेच लगतच्या जमिनाची वापर करून भाजिपाला, फळे, फूल लागवड करून रोजगार निर्मिती करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

सोमवारी कोव्हीड नियमांचे पालन करीत ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत  जलबोट फेरीची चाचपणी करण्यात आली. फेरीबोट चाचपणीच्या वेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, सर्व नगरसेवक, सोळजाई देवस्थान अध्यक्ष बापू गांधी, नागरिक उपस्थित होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जल पर्यटनस्थळ विकसित करणाण्यासाठी नगर पंचायतीच्यावतीने ठोस पावले उचलली जाणार आहेत. एक ते दीड किलोमिटर अंतराचा फेरी बोटीचा आनंद उपभोगता येणार आहे. तसेच हा सर्व परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यावर भर दिला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular