रत्नागिरीच्या भगवती जेटी आणि भाट्ये समुद्रातील हालचालींची माहिती देणारे तरंगते उपकरण ‘वेव्ह रायडर बोया’ काही दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाल्याने त्याची माहिती मिळणे कठीण बनले आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत ‘वेव्ह रायडर बोया’ वाहून गेल्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र, (ईनकाइस), भू-विज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि जी. एम. वेदक महाविद्यालय, तळा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या भगवती जेटी आणि भाट्ये समुद्राजवळ हा बोया बसवण्यात आला होता. समुद्रातील हालचालींची माहिती देणारे तरंगते उपकरण त्सुनामी, फयान, वादळ, वारे इत्यादी समुद्रातील संभाव्य हवामानाची माहिती देणारे हे यंत्र तांत्रिक बिघाड झाल्याने गायब झाले आहे. त्यांची माहिती मिळणे अवघड बनले आहे. तसेच त्यावरील जीपीएस बंद आहे.
तो हवा आणि लाटांमुळे बसवलेल्या ठिकाणापासून स्थलांतरित झाला आणि किनाऱ्यावर येऊन लागला तर त्याची माहिती प्रकल्पाला देण्यात यावी, असे आवाहन समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना करण्यात आले आहे. बहुदा तो हवा आणि लाटांमुळे बसवलेल्या ठिकाणपासून स्थलांतरित झाला आहे. तो किनाऱ्यावर दिसून आला तर त्याची माहिती प्रकल्पाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे तरंगते उपकरण मच्छीमार बांधवांसाठी मासेमारी करण्यासाठी जाताना येताना तसेच त्याची माहिती किनारपट्टीवरील लोकांसाठी उपयुक्त आहे. तरी त्याची माहिती प्रकल्प अधिकारी डॉ. बी. जी. भवरे (९८२२६२०४२१) व भरत कुमार (ईनकाइस मो. ०८१२१३१७१९४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.