25.4 C
Ratnagiri
Friday, October 31, 2025

देशातील सरकार घटना पाळतच नाही आ. भास्कर जाधव यांची सडकून टीका

७४ व्या घटना दुरुस्तीनंतर ऑक्टो. आज देशामध्ये...

ताम्हाणी घाटात अपघात, डोंगरावरून कोसळलेली दरड डोक्यात पडून महिला ठार

माणगाव-पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंडेथर...

पूररेषेतील बांधकामांना दिलासा ! नगरविकास विभागाकडून समिती

पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याने नियम शिथिल करावेत,...
HomeSportsवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-२० मालिकेतून काही खेळाडूंना विश्रांती

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-२० मालिकेतून काही खेळाडूंना विश्रांती

या दौऱ्यासाठी भारतीय बोर्डाने काही दिवसांपूर्वी एकदिवसीय संघाची घोषणा केली होती

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांना तेथे होणाऱ्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर केएल राहुल, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवचे पुनरागमन झाले आहे. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच राहुल-कुलदीप खेळू शकतील. भारतीय संघ २२ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे.

वेस्ट इंडिज मालिकेतील दोन टी-२० सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवले जाणार आहेत. हे दोन्ही सामने ६ आणि ७ ऑगस्ट रोजी होणार आहेत. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ २२ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिज आणि अमेरिकेचा दौरा करणार आहे. २२ ते २७ जुलै दरम्यान पहिले तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. त्यानंतर २९ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान पाच टी-२० सामने होतील.

या दौऱ्यासाठी भारतीय बोर्डाने काही दिवसांपूर्वी एकदिवसीय संघाची घोषणा केली होती. संघाची कमान शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. तर विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

हि आहे टी-२० टीम. रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर.के. अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

आणि हि वनडे टीम आहे. शिखर धवन, रवींद्र जडेजा,  ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), शार्दूल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह।

RELATED ARTICLES

Most Popular