23.7 C
Ratnagiri
Tuesday, December 2, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunशासनाने कोकणात ओला दुष्काळ जाहिर करावा - शौकतभाई मुकादम

शासनाने कोकणात ओला दुष्काळ जाहिर करावा – शौकतभाई मुकादम

कोकणामध्ये भात, नाचणी, वडी तांदुळ हे पावसाळयामध्येच येणारे पिक आहेत. 

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला. त्याच अनुषंगाने कोकणातील पावसाची सरासरी जास्त बघायला मिळाली. हवामानामध्ये बद्दल झाला, लवकर येणाऱ्या पिकाचे भात (हळवे) याला भाताची लोंबी पसरताना पाऊस लागल्यामुळे भाताला लोंबी धरली नाही व महान पिकाचे भात आहे ते खाली पडले. पानतलाच्या शेतीमध्ये पाणी साठून राहिल्यामुळे काही ठिकाणचे भात कुजून गेले. यामुळे कोकणामधल्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने कोकणामध्ये ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. कोकणामध्ये भात, नाचणी, वडी तांदुळ हे पावसाळयामध्येच येणारे पिक आहेत.

दुसरे कोणतेही शेतीमध्ये उत्पन्नाचे साधन नाही. तरी शासनाने यांची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे व कोकण व्यतिरिक्त शेतामध्ये येणाऱ्या पिकाचे नुकसान झाले तर जे निकर्ष लावले जातात व भरपाई दिली जाते त्याच पद्धतीने कोकणातील झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी अशीही मागणी मुकादम यांनी केली आहे. ङ्गतालुक्यातील कृषि अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन शेताच्या बांधावर जाऊन चिपळूण तालुक्याम ध्ये शेतीची पाहणी मुकादम यांनी केली. यावेळी माजी उप सभापती राजाभाऊ चाळके, खालील पटाईत, माजी पोलिस पाटील दत्ताराम शिंदे, निलेश कदम, अमित घडशी, योगेश कदम, जिवाजी कदम व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular