23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeChiplunमहापुराच्या संकटात भाजप आणि नारायण राणेंनी चिपळूणला काय दिले? आम. भास्कर जाधव

महापुराच्या संकटात भाजप आणि नारायण राणेंनी चिपळूणला काय दिले? आम. भास्कर जाधव

आम. जाधवांनी थेट भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टार्गेट केले.

महापूर काळात येथे भाजपचे मोठे नेते आले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील आले होते. स्वतः राज्यपाल आले, पण त्यांनी चिपळूणसाठी काय दिले, ते भाजप व त्यांच्या अंध भक्तांनी जाहीर करावे. असे थेट आव्हानच आम. भास्कर जाधव यांनी भाजप व नारायण राणे यांना दिले. जर पुन्हा हे नेते येथे आले तर त्यांना जाब विचारा असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. येथील ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रम भात ते बोलत होते. चिपळूण शहरातील मार्कंडी येथील ‘चौकात ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते आम. भास्कर जाधव यांच्या बरोबर जिल्हाप्रमुख सचिन त कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, ह शहरप्रमुख शशिकांत मोदी, महिला शहर संघटक वैशाली शिंदे, माजी नगरसेवक संजय रेडीज, माजी प. स. गट नेते राकेश शिंदे, फैसल कासकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. यावेळी आम. जाधवांनी थेट भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टार्गेट केले. केंद्रातील इतके मोठे मंत्रिपद असताना त्यांनी कोकणासाठी काय केले. किती उद्योग व्यवसाय आणले? याचे उत्तर त्यांनी जनतेसमोर येऊन द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. चिपळूण शहरावर म हापूराचे संकट आले त्यावेळी देवेन्द्र फडणवीस, प्रवीण दरेकर, नारायण राणे आणि त्यावेळचे राज्यपाल भगतशिंग कोश्यारी असे भाजपचे सर्व नेते मंडळी येथे आले होते. नंतर भागवत कराड हे देखील येऊन गेले. मोठमोठ्या घोषणा करून गेले. पण चिपळूण साठी एक दमडी देखील दिली नाही. याचा जाब आता तुम्ही विचारला पाहिजे.

हिम्मत असेल तर भाजप व त्यांच्या अंध भक्तांनी व्यासपीठावरून जाहीर करावे, असे थेट आव्हानच आम. भास्कर जाधव यांनी भाजपला दिले. महापूर ओसरताच तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तातडीने चिपळूणात दाखल झाले. सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावली. आणि तात्काळ येथील पूरग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत जाहीर केली. व्यापाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार दिले. इतकेच नव्हे तर पूर नियंत्रण उपाययोजनासाठी तब्बल ३ हजार कोटींची तरतूद केली. हे काम शिवसेना आणि महाविकास आघाडीने केले.

कोरोना काळात एक-एक जीव वाचवला. हे विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले. चिपळूण शहरातील शिवसेनेत काहीशी पडझड झाली असेल. पण अजिबात चिंता करू नका.पक्ष तुमच्या पाठीशी आहे. आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनिशी तुमच्या बरोबर आहोत. शहरात पुन्हा बांधणी करू, पुन्हा तेच वैभव निर्माण करू, असा ठाम विश्वास व्यक्त करत आम. जाधवांनी जुन्या शिवसैनिकांची आठवण काढत सर्वांना आर्त साद घातली. या सर्वांनी एकत्र या, पक्षाला तुमची गरज आहे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

Most Popular