25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeTechnologyडेस्कटॉप यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर

डेस्कटॉप यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर

डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप चॅट्सचा अधिक चांगला आणि सुरक्षित करण्यासाठी पिन देखील आवश्यक असेल.

सोशल साईटवर सर्वात जास्त चर्चेत असणारे अॅप हे सध्या व्हॉट्सअॅप आहे. विविध प्रकारच्या सोयी सुविधा ते ग्राहकांना पुरवत असत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर आणणार आहे. हे फिचर केवळ डेस्कटॉप यूजर्ससाठी असणार आहे. जे व्हॉट्सअॅप डेस्कटॉपच्या सुरक्षेसाठी आणण्यात आले आहे. त्याचे नाव टू स्टेप व्हेरिफिकेशन फीचर असेल. या फिचरमुळे, तुम्ही अनधिकृत लॉगिन टाळण्यास सक्षम ठरणार आहात. हे फीचर बंधनकारक नसून, ऑप्शनल आहे.

प्राप्त माहितीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे फीचर इनेबल किंवा डिसेबल करणे शक्य होणार आहे. या फीचरसह, तुम्ही नवीन स्मार्टफोनद्वारे व्हॉट्सअॅपवर लॉग इन केल्यास, अॅप तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ६-अंकी कोड पाठवेल. सध्या, डेस्कटॉप लॉगिनसाठी, तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप  वेबवर QR कोड स्कॅन करायचा आहे आणि तुमचे खाते लॉगइन होते. यासाठी कोणत्याही प्रकारच्या पिनची आवश्यकता पडत नाही. पण यापुढे पिनची आवश्यकता भासणार आहे.

आता डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप चॅट्सचा अधिक चांगला आणि सुरक्षित करण्यासाठी पिन देखील आवश्यक असेल. WABetaInfo म्हणते की व्हॉट्सअॅप सर्वत्र टू-स्टेप व्हेरिफिकेशनला मॅनेज करणे सोपे करू इच्छित आहे, म्हणून ते आगामी अपडेटमध्ये वेब/डेस्कटॉपवर हे वैशिष्ट्य सादर करण्यावर काम करत आहेत. सध्या त्याची ट्रायल केली जात असली तरी, ते लवकरच व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केले जाऊ शकते.

अहवालात असे नमूद केले आहे की वेब/डेस्कटॉप यूजर्स टू-स्टेप व्हेरिफिकेशनला इनेबल किंवा डिसेबल करु शकतील. जेव्हा तुमचा फोन हरवतो आणि तुम्हाला तुमचा पिन लक्षात नाही तेव्हा हे आवश्यक होते. तुम्ही रिसेट लिंकद्वारे पिन रिस्टोअर देखील करू शकता.

RELATED ARTICLES

Most Popular