22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeTechnologyव्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये नवीन फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये नवीन फीचर्स

या नव्या फीचरचा वापर करून तुम्ही आपले खाजगी आयुष्य खाजगीच ठेऊ शकता, त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरू शकते.

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन प्रायव्हसी फीचर्स काही दिवसांपूर्वी आयओएसवरील बीटा अ‍ॅपवर कार्यान्वित करण्यात आले होते. व्हॉट्सअ‍ॅपवर इन्स्टंट मेसिजिंग अ‍ॅपचा अनुभव सहज सोप्पा होण्यासाठी सोबतच प्रायव्हसी जपून राहण्यासाठी काही ना काही नवीन फीचर्सवर टेस्ट करण्यात येत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनवर देखील या फिचरची टेस्ट होत असल्याची माहिती एका वेबसाईटच्या माध्यमातून समोर आली आहे.

कंपनी जुन्या फीचर्समध्ये बदल करत असून आता व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी एका नवीन  प्रायव्हसी सेटिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. या सेटिंगचा वापर करून युजर्स निवडक लोकांपासून आपले प्रोफाईल फोटो, स्टेटस, लास्ट सीन लपवून ठेऊ शकतात. ही माहिती Wabetainfo  या टेक वेबसाईटने दिली आहे.

काही वेळा युजर्सला काही व्यक्तींना वगळून एखादी गोष्ट व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करायची असते. पण आधी तशी सेटिंग कंपनीने न दिल्याने, सर्व युजर्सना फोटोपासून लास्ट सीन सर्व दिसत होते. पण आता निवडक कॉन्टॅक्ट्सपासून लास्ट सीन, स्टेटस, प्रोफाईल पिक्चर आणि स्टेटस लपवून ठेवता येणे शक्य होणार आहे. सध्या टेस्ट सुरु असलेले हे फिचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

या नव्या फीचरचा वापर करून तुम्ही आपले खाजगी आयुष्य खाजगीच ठेऊ शकता, त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरू शकते. Wabetainfo  साईटच्या अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपवर आता लास्ट सीनमध्ये युजर्सना ‘My contacts except.’ हा ऑप्शन मिळणार असून, लास्ट सीन ऑप्शनसाठी मात्र सध्या Everyone, My contacts आणि Nobody असे तीनच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये सुद्धा काही नवीन फीचर्स कंपनी निर्माण करण्याच्या प्रयत्नात असेल.

RELATED ARTICLES

Most Popular