23.5 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeTechnologyव्हॉट्सअ‍ॅपच नवीन फिचर, प्रिव्ह्यू बिफोर वॉइस मॅसेज

व्हॉट्सअ‍ॅपच नवीन फिचर, प्रिव्ह्यू बिफोर वॉइस मॅसेज

सोशल मीडियावर आघाडीवर असलेली व्हॉट्सअ‍ॅप कंपनी नेहमी आपल्या अ‍ॅप्समध्ये आवश्यकतेनुसार बदल घडवत असते. आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. मागील वर्षापासून साधरण १० नवीन फीचर्स या कंपनीने सुरु केली असतील.

काही वेळा एखाद्या ग्रुपमध्ये अनेक वॉइस मॅसेज येतात पण त्याच्या आधारीत काहीच प्रिव्ह्यू किंवा शीर्षक नसते किंवा काही वेळा त्याचे आवाज नीट येत नसतात. त्यामुळे काही जण ते डाऊनलोड करण्याच टाळून सरळ डिलीट करतात. किंवा काही वेळेला डाऊनलोड केले तर काहींही अर्थहीन ऑडियो असतो. त्यामुळे नक्की कसला वॉइस मॅसेज आहे हे कळण्यासाठी  आता यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर वॉइस मॅसेज करण्यापूर्वी त्याचा प्रिव्ह्यू आपल्याला ऐकू येणार आहे. या फिचरचा आनंद लवकरच यूजर्सला घेता येणार आहे. अशी घोषणा व्हॉट्सअ‍ॅप कंपनीकडून करण्यात आली आहे.

जर एखाद्या वेळी वॉइस मॅसेज हा बरोबर रिकॉर्ड झाला नसेल, तर त्याला आपण डिस्कार्ड करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. त्यानंतर पुन्हा वॉइस मॅसेज पाठवण्यासाठी मात्र आपल्याला पुन्हा मॅसेज रेकॉर्ड करावा लागणार आहे. हा नवीन वॉइस मॅसेज प्रिव्यू फिचर वैयक्तिक आणि ग्रुप चॅटींगला देखील सपोर्ट करणार आहे.

त्यासाठी प्रोसेस काय आहे ते पाहूया थोडक्यात. सुरुवातीला आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअ‍ॅप स्क्रिनवर जाऊन, नंतर चॅट स्क्रिनवर मायक्रोफोनचा पर्याय दिसेल. त्याला टच केल्यावर हँड्स-फ्री रेकॉर्ड लॉक करण्यासाठी वरती स्लाइड करायचे. नंतर तुम्हाला काही पर्याय मिळेल,  त्याद्वारे रेकॉर्डींग बंद करू शकतो किंवा त्याला ट्रॅशमध्ये टाकू शकतो. किंवा स्टार्ट बटनवर क्लिक करत आपण आपले वॉइस मॅसेजचे प्रिव्यू करू शकता. काही दिवसातच याचे अपडेट यूजर्सना दिले जाणार आहे. जर व्हॉइस मॅसेज पाठवण्यास जास्त प्राधान्य दिले जात असेल तर हे फिचर नक्कीच उपयुक्त ठरेल.

RELATED ARTICLES

Most Popular