कतरिना कैफ लग्न झाल्यापासून फारशी सोशल मिडीयावर दिसून आली नसल्याने अखेर, इन्स्टाग्रामवर एका इंग्रजी वेबसाईटनं कतरिनाच्या लाइमलाइटपासून दूर राहण्याचं कारण थेट नेटकऱ्यांनाच विचारलं आहे. तेव्हा चाहत्यांनी विविध तर्क-वितर्क लावून कमेंटची बरसात केली आहे. सगळ्यात जास्त चाहत्यांनी तर कतरिना विकी कौशलच्या बाळाला जन्म देणार असल्याचा अंदाज लावला आहे. एका चाहत्यानं तर म्हटलं आहे की, ‘कतरिना या महिन्यात तिच्या वाढदिवसाच्या दिवशी १६ जुलैला मोठी बातमी देणार आहे.
कतरिना कुठेच सार्वजनिक कार्यक्रमात म्हणजे पार्टी, एअरपोर्टवरही दिसून येत नाही आणि सोशल मीडियावरूनही गायब आहे आणि याचं काय कारण आहे हे ती १६ जुलैला वाढदिवशीच सांगेल’, असं हा चाहता म्हणाला आहे. काही चाहत्यांनी म्हटलं की, करणच्या ‘कॉफी विथ करण’च्या शूटमध्येही ती सहभाग घेणार नाही अस कळलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी गूड न्यूज असणार आहे.
कतरिना कैफला शेवटचं करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पार्टीत पाहिलं गेल होतं. अर्थात ते देखील मे महिन्यामध्ये. पण तेव्हापासून ती कुठेच दिसलेली नाही. तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्टही काही आठवड्यांपूर्वी केलेली दिसत आहे. ‘भूत पोलिस’ या तिच्या सिनेमा संदर्भात हि पोस्ट करण्यात आली आहे. आणि तेव्हापासून ती सगळीकडून गायबच झाल्यासारखी झाली आहे. पण यावर मात्र नेटकऱ्यांनी आपले तर्क-वितर्क कमेंटद्वारे मांडायला सुरुवात केली आहे.
कतरिनाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर लवकरच ती आपल्याला ‘फोनभूत’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील दिसणार आहेत. कोरोना दरम्यान या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती आणि गेल्या वर्षाच्या शेवटी सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाले. ‘फोन भूत’ येत्या ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.