27.8 C
Ratnagiri
Tuesday, February 17, 2026

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...

एमआयडीसीतील मत्स्य उत्पादक कंपनीला दिड कोटींची गंडा

रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील 'मे. जिलानी मरीन...

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...
HomeChiplunचिपळुणात कुणाचा सभापती होणार? किंगमेकर शेखर निकमांच्या निर्णयाकडे लक्ष

चिपळुणात कुणाचा सभापती होणार? किंगमेकर शेखर निकमांच्या निर्णयाकडे लक्ष

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १० सदस्यांची गरज असणार आहे.

चिपळुणात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने पंचायत समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. राष्ट्रवादीचे ७ सदस्य निवडून आल्याने आमदार शेखर निकम हे किंग मेकरच्या भुमिकेत असून ते महायुतीसोबत जातात की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहकार्याने सत्ता स्थापन करतात याची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत चिपळूण पंचायत समितीसाठी मतदारांनी स्पष्ट बहुमत न दिल्याने चिपळूण पंचायत समितीवर सत्ता कोणाची येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला समसमान प्रत्येकी ७ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना उबाठा पक्षाला ४ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १० सदस्यांची गरज असणार आहे.

या आकड्याच्या जुळवाजुळवीसाठी कोण कोणाला साथ देणार? कोणाचा सभापती बसणार? याच्या आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गेट) पक्षाचे आमदार शेखर निकम, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण, आमदार भास्कर जाधव, भाजप नेते प्रशांत यादव यांच्या भुमिका चिपळूण पंचायत समितीवर सत्ता कोणाची येणार ते ठरविणारे आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती झाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर या निवडणुकीसाठी ‘एक ला चलो रे’ची भूमिका घेतली. शिवसेना शिंदे पक्षाने ११ तर भाजपाने ६ जागांवर उमेदवार उभे केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने स्वतंत्रपणे ती निवडणूक लढवताना सर्वच जागांवर उमेदवार उभे केले होते.

शिवसेनेचे ४ तर भाजपचे ३ सदस्य निवडून आले आहेत. उबाठाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. सभापती पदासाठी जो कोण पाठिंबा देईल? आपल्याला त्याच्यासोबत आपण राहू, अशी स्पष्ट भूमिका आ. निकम यांनी निकालानंतर व्यक्त करतांना शिवसेना उबाठा पक्षाबरोबर जाण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, चिपळूण पंचायत समितीवर सत्ता स्थापनेच्या दृष्टीने निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, हेदेखील सांगण्यास ते विसरले नाहीत. एकंदरीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ७ पंचायत समिती सदस्य तर ३ जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचे सिद्ध झाले आहे. शेखर निकम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून त्यांचा पक्ष राज्यात महायुतीच्या सत्तेमध्ये सहभागी आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीसोबत येवून सत्ता स्थापन करावी असे प्रयत्न शिवसेना-भाजपकडून सुरू आहेत. तर उबाठाकडूनही हालचाली सुरू आहेत. शेखर निकम कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular