27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeSportsकोण लढणार भारतासमोर अंतिम फेरीत? आशिया करंडक

कोण लढणार भारतासमोर अंतिम फेरीत? आशिया करंडक

हा सामना जिंकणारा संघ रविवारी भारतासोबत अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर फेरीतले भारताने पाक आणि श्रीलंकेविरुद्धचे सामने जिंकल्याने गुरुवारी होणारा पाकविरुद्ध श्रीलंका सामना एका अर्थाने उपांत्य सामन्यासारखा झाला आहे. हा सामना जिंकणारा संघ रविवारी भारतासोबत अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे. श्रीलंकन संघाने भारताला कौतुकास्पद लढत दिलेली असताना पाकिस्तान संघ मोठ्या पराभवाने आणि दोन मुख्य गोलंदाजांच्या दुखापतीने चांगलाच हादरला आहे. पाकिस्तानकडे राखीव चांगल्या खेळाडूंची कुमक असली, तरी श्रीलंकेला त्यांच्या मायदेशात हरवण्याचे कठीण आव्हान पाकिस्तानला पेलावे लागणार आहे.

श्रीलंका संघाचे सगळेच सामने रंगतदार झाले. साखळी स्पर्धेतला त्यांचा अफगाणिस्तान समोरचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. बांगलादेशने श्रीलंकेसमोर शक्य असलेला विजय गमावला आणि भारतासमोर श्रीलंकेला विजयाची पुसटशी का होईना शक्यता होती. याचे दोन अर्थ निघतात. एकतर श्रीलंकन संघ कष्ट करून विजय कसा मिळवायचा, हे जाणून आहे किंवा दुसरा अर्थ म्हणजे, कोणताही चांगला संघ श्रीलंकेला योग्य वेळी निर्णायक कामगिरी करून पराभूत करू शकतो. पाकिस्तानला पराभूत करायचे झाल्यास चांगली फलंदाजी करायचे आव्हान त्यांना पेलावेच लागेल, पाकिस्तान संघाला अडचणीत आणायला चांगली धावसंख्या उभारण्या किंवा पाठलाग करायची हिंमत ठेवण्यावाचून श्रीलंकेला पर्याय नाही.

पाकिस्तान संघाचे दोन बिनीचे गोलंदाज हॅरीस राऊफ आणि नसीम शाह दुखापतीने त्रस्त झाले आहेत. मुख्य वर्ल्डकप तोंडावर आला असताना प्रमुख गोलंदाजांना दुखापत झाली तर कर्णधाराला घाम फुटतो. सर्व ताकद वर्ल्डकपसाठी राखून ठेवायची असल्याने बाबर आझम नसीम शाह किंवा हॅरीस राऊफला १०० टक्के तंदुरुस्त झाल्याशिवाय खेळवण्याचा धोका पत्करणार नाही. पाकिस्तानचे फलंदाजही म्हणावे तसे लयीत अजून आलेले नाहीत. थोडक्यात सांगायचे तर पाकिस्तानला गुरुवारचा सामना आपली खरी ताकद अजमावण्याचा आणि खरी लय शोधण्यासाठी कामी येणार आहे. पहिल्या काही सामन्यांना भयानक तिकीट दरामुळे प्रेक्षकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला होता.

अखेर संयोजकांना उशिरा का होईना जाग आल्याने तिकिटाचे दर झपाट्याने कमी करण्यात आले आहे.  नव्याने जाहीर केलेले तिकीट दर नेहमीपेक्षा किंचित जास्त असले तरी अगोदरच्या तुलनेत खूप कमी केले आहेत. भारतासमोर प्रेमदासा स्टेडियमवर आपल्या संघाला पाठबळ द्यायला श्रीलंकन क्रिकेट चाहत्यांनी बऱ्यापैकी गर्दी केली होती. गुरुवारच्या सामन्याला म्हणूनच दासुन शनकाला गुरुवारच्या सामन्यात प्रेक्षकांचे मोठे पाठबळ लाभायची शक्यता आहे. गुरुवारच्या सामन्यासाठी श्रीलंका भारतासमोर होते. तसे संथ आणि काहीसे फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बनवते की फलंदाजीला पोषक बनवते, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular