28.2 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeMaharashtraशिवाजी पार्कवर दसरा मेळावा नक्की कोणाचा होणार....!!

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नक्की कोणाचा होणार….!!

गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ज्यांच्या बरोबर ४० आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा. अस त्यांनी म्हटल. त्यामुळे दसरा मेळावा सेनेचा की शिंदे गटाचा होणार, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा नक्की कोण घेणार? अशी राजकीय वर्तुळात चर्चा  रंगली आहे

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका अशी आक्रमक भूमिका शिंदे गटाने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर कोणताच मेळावा न होण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे. मनपानं परवानगी दिली तर त्याला विरोध केला जाणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी कोणालाच जागा देऊ नका अशी भूमिका देखील शिंदे गटाने घेतली असल्याचे म्हटलं आहे. तर एकीकडे मेळाव्यासाठी शिवतीर्थ आम्हाला द्यावे, असा अर्ज शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे केला आहे.

तसेच या सर्व परिस्थितीवर अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले असून, ते म्हणाले कि, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचा आहे, तिथे मी सविस्तर बोलेन. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा, त्यामुळे बोलताना जपून बोलावे लागायचे. आता तसे नाही,’ असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपला दिला.

RELATED ARTICLES

Most Popular