मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह, देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर येत्या ३१ जुलै रोजी सर्वो उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यांची याचिका येत्या ३१ तारखेला सूचीबद्ध करू, असे कोर्टाने म्हटले आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांनी गतवर्षी शिवसेनेत बंडखोरी केली. आपलीच शिवसेना खरी असा दावादेखील करत पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निशाणी मिळावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.
आपल्याला कालांतराने त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व निवडूक चिन्हही दिले होते. आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यात त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा अपात्रतेचा निर्णय निकाली निघेपर्यंत आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तसेच पक्षातील बहुतांश सदस्य आम च्या बाजूने असूनही आयोगाने शिंदेंना नावे व पक्षचिन्ह बहाल करण्याचा निर्णय चुकीचा होता, असा दावाही त्यांनी या याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्या या याचिकेवर येत्या ३1 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे वादाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे.