पूल खचला… बेफिकीरपणा मग भुर्दंड आम्हाला का ?.. ज्याच्या कोणाचा दोष आहे त्यांना शासन करा… तात्काळ उपाय योजना करा, आमच्या प्रवासाचा खर्च वाढला आहे. त्याला जबादार कोण असा सवाल करीत येत्या पंधरा दिवसात उपाययोजना करा. अन्यथा तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला असून या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन त्यांनी दिले आहे. खड्पोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पिंपळी मार्गावर असणारा महत्वाचा पूल कोसळला आहे. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झालो नाही. मात्र धोकादायक झालेला हा पूल बांधकाम विभागाच्या ‘अधिकाऱ्यांनी कळला नाही हे दुर्दव्य आहे. मात्र या साऱ्याचा भुर्दंड आम्हाला का ? आज दसपटीकडे जाणारी जाणाऱ्या प्रवाशांना साडेतीन किमी अधिक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास हा महाग झाला आहे. तसेच कंपन्या व अन्य ठिकाणी कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही असाच लांबचा प्रवास करावा लागत आहे. याचा मालवाहतुकीला ही फटका बसला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसाम ान्य जनता, कामगार आणि वाहतूकदार यांना आर्थिक फटका बसला आहे. ज्याचा कोणचा दोष असेल त्याला शिक्षा करा आम्हाला हा मनस्ताप नको. येत्या पंधरा दिवसात ठोस उपाययोजना करा. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी देताना आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देताना या संदर्भात निवेदन ही त्यांनी दिले आहे. यावेळी वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, रिक्षा वाहतूक संघटनेचे राजेंद्र उंडरे, उपशहराध्यक्ष विनोद चिपळूणकर, माजी विभाग अध्यक्ष सुनील सुर्वे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सागर चिले, गजानन राक्षे सुनील घाडगे, सूरज घाग, संजय वाजे, उमेश पवार, राजाराम शिंदे, मनोज सोलखी , सुनील देवरुखकर, संदीप बामणे, महेंद्र कदम आदी उपस्थित होते.