28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार...

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तो स्वप्नात येऊन सांगतोय की मदत करा !

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा...
HomeLifestyleअनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला का निरोप दिला जातो !

अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला का निरोप दिला जातो !

गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. यामागे एक पौराणिक कथा आहे.

गणेशोत्सव म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच एक उत्साहवर्धक सण असतो. गणपती बद्दलच्या अनेक पौराणिक कथा या दिवसामध्ये विशेषत: घरातील जेष्ठ मंडळी लहानग्यांना सांगताना आढळतात. त्यामध्ये गणपतीची निर्मिती त्याचे पालक शिवपार्वती कसे करतात, गणपती स्थापनेच्या पहिल्या दिवशी चंद्राचे दर्शन का वर्ज असते त्यापासून ते अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन का करतात! आज आपण जाणून घेऊया नेमकी अनंत चतुर्दशीला का बाप्पाचे विसर्जन करतात?

लहान मुलांची सर्वात धम्माल असते ती गणपतीमध्ये. देवाकडे काय आणि किती मागू असे त्यांचे झालेले असते. अगदी विसर्जनाच्या दिवशी हमसून हमसून रडणारी मुल सुद्धा आपण पाहतो. घरातील जेष्ठांना बाप्पा नका विसर्जन करून दयावया करणारी अनेक चिमुकली डोळ्यासमोर तरळतात. कशाला केले पाहिजे बाप्पाचे विसर्जन, राहूदे ना आपल्याकडेच कायमचा, असा सोज्वळ हट्ट पालकांकडे धरणारी अनेक बालक असतात.

परंतु, गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. यामागे एक पौराणिक कथा आहे. असे म्हणतात कि, ज्या दिवशी वेद व्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी गणपतीला महाभारताची कथा कथन करण्यास सुरुवात केली,  तेंव्हा तिथी भाद्र शुक्ल चतुर्थीची होती. कथा सांगत असताना वेद व्यासांनी डोळे मिटले आणि सलग १० दिवस ते गणपतीला कथा सांगतच होते. आणि गणपती अखंडितपणे ती लिहत राहिले. अखेर जेंव्हा १० व्या दिवशी वेदव्यासांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की एका ठिकाणी बसून सतत लिखाण करत असताना, गणपतीच्या शरीर तापमानमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

गणपतीला अशा परिस्थितीमध्ये शीतलता प्राप्त होण्यासाठी वेद व्यासांनी थंड पाण्यात डुबकी मारली. जिथे गणपती वेद व्यासांच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते, तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचे एकत्र भेटीचा संगम होता. ज्या दिवशी वेद व्यासांनी सरस्वती आणि अलकनंदाच्या थंड पाण्याच्या संगमात स्नान केले, तोच दिवस अनंत चतुर्दशी म्हणून गणला जातो. आणि हेच ते कारण आहे जेंव्हा  चतुर्थीला स्थापना केल्या नंतर १० दिवसांनी येणाऱ्या अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते. यावर्षी रविवारी १९ सप्टेंबर २०२१ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने १० दिवसांच्या बाप्पाना निरोप दिला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular