भारताचा महान फलंदाज १६ नोव्हेंबर २०१३ रोजी शेवटचा सामना खेळला. त्यांच्या निवृत्तीनंतर संपूर्ण देश अतिशय भावूक झाला होता. त्यावेळी विराट कोहलीने सचिनला एक खास भेट दिली होती. सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीत सांगितले आहे की, कोहलीची ती भेट पाहून मी खूपच भावूक झालो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते.
एका मुलाखतीत सचिनने हि आठवण आवर्जून सांगितली. तो म्हणाला की, माझ्या शेवटच्या कसोटीनंतर मी ड्रेसिंग रूममध्ये एका कोपऱ्यात बसून रडत होतो. त्यावेळी विराट माझ्याकडे आला आणि त्याने मला एक पवित्र असा लाल धागा दिला, जो त्याच्या वडिलांनी त्याला दिला होता आणि ती त्यांची शेवटची निशाणी होती. मी तो धागा काही काळ माझ्याकडे ठेवला आणि नंतर विराटला परत केला. मी त्याला म्हणालो कि, हि तुझ्या वडिलांनी दिलेली अनमोल भेट आहे आणि ते तुझ्याकडेच राहिले पाहिजे. इतर कोणाकडे नाही. ही केवळ तुझी संपत्ती आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती तुझ्याकडेच राहिली पाहिजे.
कोहलीने तो किस्सा सांगितला कि, माझ्या हृदयाच्या जवळ असलेली सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांनी मला दिलेला हा लाल धागा. ते कायम हा धागा घालायचे. म्हणून मी तो कायम माझ्या बॅगेत ठेवतो. त्यामुळे मला वाटले की माझ्या वडिलांनी मला दिलेली ही सर्वात मौल्यवान वस्तू आहे आणि यापेक्षा अधिक मौल्यवान वस्तू मी सचिनला देऊ शकत नाही.’ तो एक अतिशय भावनिक क्षण होता, जो माझ्या कायम स्मरणात राहील.
मी सचिन पाजी यांनाही सांगितले की, त्यांनी मला किती प्रेरित केले आहे आणि ते माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. ही माझ्याकडून छोटीशी भेट आहे, पण सचिनने ती भेट काही क्षणासाठी घेतली आणि मला परत केली. हा क्षण सांगताना सुद्धा विराट अतिशय भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.