23.8 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRajapurराजापूर निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

राजापूर निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

राज्यात एसटीचा सुरु असलेला बेमुदत संप पाहता, सरकारसुद्धा आता कडक कारवाई करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आणि तशी सुरुवात पण करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हातील राजापूर तालुक्यातील चालक आणि वाहक अशा दोन्ही सेवा बजावणाऱ्या एकाचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले.

संपात निलंबित केल्याने हृदविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेल्या राजापूर आगारातील ३५ वर्षीय चालक कम वाहक राकेश रमेश बांते याच्या मृत्युनंतर एसटी कर्मचारी व पत्नीने आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी आगार प्रमुखांवर सदोष मन्युष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,  अशी मागणी पत्नी भाग्यश्री बांते आणि इतर कर्मचार्यांनी लावून धरली आहे. त्याचप्रमाणे, बांते यांच्या पत्नी व दोन्ही मुलांच्या संगोपनाबाबत प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे, अशी आग्रही मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांना हे निवेदन कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे.

निवेदनानुसार, माझे पती राकेश रमेश बांते हे राज्यव्यापी सुरु असलेल्या संपामध्ये राजापूर आगार येथे एसटी कर्मचारी दुखवट्यात सामील झाले होते. यामुळे त्यांच्यावर आगार व्यवस्थापकांनी निलंबनाची कारवाई केली होती. तेव्हापासून ते प्रचंड मानसिक दडपणाखाली होते. त्यामुळे माझ्या पतीचा मृत्यू हा केवळ राजापूर आगार व्यवस्थापकांच्या मुळेच झाला आहे, यासाठी केवळ हेच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी,  अशी मागणी बांते यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी केली आहे.

त्यांच्या मूळ भंडारा गावाहून नातेवाईक रात्री उशिरा राजापूरमध्ये आले असता, पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. परंतु अशा प्रकारे ओढवलेल्या अचानक मृत्यूने त्यांनी सुद्धा संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. परंतु अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर रात्री उशिरा मयत राकेश रमेश बांते यांच्यावर राजापूर स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular