26.4 C
Ratnagiri
Monday, October 13, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriरानडुकरांचा धुमाकूळ; भातपीक उद्ध्वस्त! भगवतीनगरमध्ये शेतकऱ्याचे नुकसान

रानडुकरांचा धुमाकूळ; भातपीक उद्ध्वस्त! भगवतीनगरमध्ये शेतकऱ्याचे नुकसान

त्याचबरोबर माकडांचाही त्रास शेतकऱ्यांना होत आहे.

गेले दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र भातकापणीची तयारी सुरू झाली आहे; मात्र कापणीयोग्य झालेल्या भाताची रानडुकरांकडून नासधूस होत आहे. लोंब्यांमध्ये दाणे भरू लागले असून, त्यावर रानडुकरे कळपाने डल्ला मारत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील उमेश रहाटे यांच्या सव्वादोन एकर क्षेत्रांपैकी एक एकर क्षेत्रातील भातरोपांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेजारील कोंडवाडी, मिरवणे, उभे पाटवाडी परिसरातीलही भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी तीन महिने रहाटे यांनी यंदा अडीच एकर क्षेत्रावर भातशेती केली होती. नांगरणी, बी-बियाणे, खते, लावणी, भातक्षेत्रातील साफसफाई आणि कापणी अशा विविध शेतीकामांसाठी यंदा त्यांना सुमारे २० हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता. मागील काही वर्षे त्यांनी भातशेती करणे सोडले होते. त्यांची भातशेती खाडीकिनारी आहे. उशिराने होणारे बियाणे पेरल्यामुळे सध्या रोपांना लोंब्या चांगल्याप्रकारे फुटू लागल्या आहेत.

लोंबीतील दाणेही हळूहळू भरू लागले होते. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात कापणी सुरू करण्याची तयारीही रहाटे यांनी केली होती; मात्र चार दिवसांपूर्वीपासून अचानक रानडुकरांचा त्रास सुरू झाला. पहिल्या दिवशी काही मळ्यांमधील शेतीचे नुकसान केले. त्यावर उपाय म्हणून रहाटे यांनी कुत्र्याचा आवाज असलेले यंत्र शेतामध्ये उभे केले; पण त्याचाही उपयोग विशिष्ट कालावधीपुरताच झाला. सलग चार दिवस रहाटे यांच्या शेतामध्ये शिरून रानडुकरांनी शेताची नासधूस केली. लोंब्यांमधील कोवळे दाणे खाऊन झाल्यानंतर त्यामध्ये रानडुकरांनी लोळण घातली होती. पावसाचे पाणी साचलेले असल्याने शेतजमिनीत चिखल झाला आहे. उभी रोपं आडवी झाली असून, लोंब्याही गळून गेल्या आहेत. यामध्ये सुमारे एक एकरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. हीच परिस्थिती भगवतीनगरबरोबरच आजुबाजूच्या चार ते पाच गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. सर्वच शेतकऱ्यांना रानडुकरांचा त्रास होत आहे. त्याचबरोबर माकडांचाही त्रास शेतकऱ्यांना होत आहे.

रत्नागिरीत मळेशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामध्ये वन्यप्राण्यांना धुडगूस घालणे सोपे झाले आहे. त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत; पण त्याही निष्फळ ठरत आहेत. काही शेतकऱ्यांनी भातशेतीच्या बाजूने साड्यांचे कुंपण बनवलेले आहे. त्यामधूनही डुक्कर शेतात शिरत आहेत. काहींनी मासे पकडण्यासाठी वापरण्यात जाळ्यांचा येणाऱ्या उपयोग केला आहे. त्याचा फायदाः शेतकऱ्यांना होत आहे; मात्र मोठ्या क्षेत्राला हा उपाय खर्चिक ठरत आहे. मिरवणे येथील एका शेतकऱ्याचे सुमारे ३ एकरवरील भात कापणीयोग्य झाले आहे. त्याच्या संरक्षणासाठी स्वतः शेतकरी शेतात ठाण मांडून बसला आहे तर काही ठिकाणी स्वतः शेतकरी रात्री जागून काढत आहे. शेतामध्ये पेटते दिवे ठेवले जात आहेत. तरीही शेतकऱ्याची नजर बाजूला गेली की, रानडुकरं शेतात शिरत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular