भारताचे चांद्रयान चंद्रापासून अवघ्या काही किलोमीटर अंतर दूर असून इस्त्रोने हे यान चंद्रावर कधी लॅण्ड होईल याची वेळ जाहीर केली आहे. भारताची ‘चांद्रयान ३’ मोहीम चंद्रावर उतरण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६.०४ वाजता चांद्रयान- ३ चंद्रावर उतरणार आहे. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशवासियांसह जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने चांद्रयान ३ मिशनमध्ये लँडर विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवण्याच्या वेळेत थोडासा बदल केला आहे. आधी नियोजित वेळ सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटे अशी होती.
पण इस्रोने ही वेळ बदलली असून आता २३ ऑगस्ट रोजी १७ मिनिटे उशिरा म्हणजेव सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी लँडर विक्रम चंद्राच्या भूमीवर उतरेल, इस्रोने सांगितलं की, चांद्रयान ३ मोहिमेचं थेट प्रसारण होणार आहे. भारतीय विज्ञान, इंजिनिअरिंग, उद्योग यासाठी हा मैलाचा दगड असणार आहे. अंतराळ संशोधनात भारताच्या प्रगतीचे हे प्रतिक असणार आहे. संपूर्ण देशाला चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लैंडिंगची घटना पाहण्याची इच्छा आहे.
थेट प्रसारण – या घटनेचे थेट प्रसारण २३ ऑगस्टला भारतीय प्रमाणवेळेनुसार ५ वाजून २७ मिनिटांनी होईल. सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रसारण इस्रोची वेबसाइट, युट्यूब चॅनेल, फेसबुक पेज आणि डीडी टीव्ही चॅनलसह इतर व्यासपीठांवरून होईल. इस्रोने म्हटलं की, चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचा क्षण अविस्म रणीय असेल. त्यामुळे फक्त जिज्ञासाच नव्हे तर आपल्या तरुणांच्या मनात संशोधनासाठीची भावनाही जागवते.
इस्त्रो इतिहास घडवणार – जर भारताच्या अंतराळ यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या भागात सॉफ्ट लैंडिंग केले तर आपला देश हा पराक्रम करणारा जगातील पहिला देश बनेल: आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या अंतराळयानांना चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात यश आले आहे. परंतु कोणत्याही देशाचे अंतराळ यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेले नाही.