25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeInternationalकॉमेडियनच्या कानशिलात लगावणे विल स्मिथला पडले महागात, १० वर्षे बंदी

कॉमेडियनच्या कानशिलात लगावणे विल स्मिथला पडले महागात, १० वर्षे बंदी

विल स्मिथवर कोणत्याही ऑस्कर पुरस्कार कार्यक्रमात उपस्थित राहण्यास १० वर्षासाठी बंदी घातली आहेत.

यंदाच्या ऑस्कर सोहळ्या दरम्यान हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने कॉमेडियन ख्रिस रॉकच्या स्टेजवर जाऊन कानाखाली मारली होती. या घटनेनंतर आता अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (ऑस्कर) ने शुक्रवारी विल स्मिथवर कोणत्याही ऑस्कर पुरस्कार कार्यक्रमात उपस्थित राहण्यास १० वर्षासाठी बंदी घातली आहेत. त्यानुसार विल स्मिथला पुढील १० वर्षे कोणत्याही ऑस्कर कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही आहे.

लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये २७ मार्च रोजी ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरु होता. दरम्यान, स्टेजवर कॉमेडियन ख्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजार पणावरुन नकळतपणे विनोद केला. ख्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथची खिल्ली उडवली. पण त्याची ही मस्करी स्मिथच्या जिव्हारी लागली आणि त्याने मंचावर जाऊन ख्रिसच्या जोरात कानशिलात लगावली. आणि त्याला सांगितले कि, माझ्यावर कमेंट केलेलं मी ऐकून घेतलं पण माझ्या पत्नीच्या आजारपणाची उडवलेली खिल्ली मला चालणार नाही.

जॅडाच्या डोक्यावर मुळताच केस कमी असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला, अशी खिल्ली उडवणारी कमेंट ख्रिसने केली. यावरुन विल स्मिथ भडकला आणि त्याने स्टेजवर जाऊन रॉकच्या थोबाडीत मारली. परंतु, त्याच्या अशा वागण्याने तिथे उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. या सोहळ्यात उपस्थित सेलिब्रिटींना सुरुवातीला हा विनोद वाटला, पण नंतर वातावरण गंभीर बनत गेले. शेवटी विल स्मिथने त्याच्या गैर वागणुकीबद्द्ल त्याची आणि कुटुंबाची जाहीर माफी देखील मागितली.

यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात स्टेजवर जाऊन सर्वांसमोर विल स्मिथने ख्रिस रॉकवर हात उगारला, त्यामुळे त्याच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आल्याचे अकादमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular