रत्नागिरी येथे महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हुकूमशाही विधेयक मागे घ्या!’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला. हे विधेयक ‘जनविरोधी’ आणि ‘घटनाविरोधी’ असल्याचे सांगत, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकशाही हक्कांवर होत असलेल्या हल्याबद्दल चिंता व्यक्त केली. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाउन प्रशासनाला त्याबाबतो निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात, नव्या विधेयकानुसार सरकारला ‘कोणत्याही नागरिकावर केवळ संशयावरून अटक, चौकशी किंवा नजरकैद करण्याचे अमर्याद अधिकार मिळतील, असा आरोप करण्यात आला. यामुळे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला धोका निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
महाविकास आघाडीने हे विधेयक त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. देशात हे विधेयक लागू करण्या डाव केंद्र आणि राज्य सरकारा आहे. हा कायदा होता कामा नये, त्यात शासनाने बदल करावा. या विधेयकामुळे देशाया राज्य घटना अपमान ठरणार आहे, ती राज्यघटना मोडण्यो काम सरकार करत आहे. जर सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपनेते बाळ माने, राष्ट्रवादो नेते बशिर मुर्तुझा यांनी दिला आहे. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस या महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले. त्यावेळी शिवसेना उबाठा उपनेते व माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, संजय पुनसकर, किरण तोडणकर, राष्ट्रवादो नेते बशीर मुर्तुझा, माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, शहराध्यक्ष निलेश भोसले, नौसिन काझी, काँग्रेसो तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, शहरप्रमुख अशफाक काद्री यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

