रत्नागिरी हे मुख्यमंत्री महोदयांचे आवडते ठिकाण आहे. यामुळे रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासाकरिता मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून जे जे शक्य होईल ते ते सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहोत हे देखील ना. सामंत जाहीर केले. प्रास्ताविक करत असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी ना.शिंदे साहेब व ना.सामंत यांची मैत्री कशाप्रकारे आहे हे स्पष्ट केले.
ठाण्यामध्ये ज्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर व मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल ही दोन्ही रुग्णालय नो कॅश काऊंटर झालेली आहेत. त्याप्रमाणे नो कॅश काऊंटर असलेलं रुग्णालय देखील पुढच्या दोन महिन्यात आम्ही रत्नागिरीमध्ये सुरु करु असा शब्द मंत्री महोदयांनी दिला. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांनी जात,पक्ष सर्वकाही बाजूला ठेवून आरोग्य क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं कार्य महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील उभं केलं आहे. त्यामुळे हा नेता सर्व सामान्यांना आपलासा वाटतो आहे. हीच आमची ताकद आहे.
ना.शिंदे साहेबांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा जागतिक विक्रम होवू शकतो व हीच ऊर्जा त्यांना २४ तास काम करण्यासाठी पुरेशी ठरते असे देखील ना.सामंतांनी आवर्जून नमूद केले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व वाडिया हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने काल व आज दोन दिवस लहान बालकांच्या हृदयाच्या छिद्रांच्या शस्त्रक्रियांचे महाआरोग्य शिबिर रत्नागिरी येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी मतदारसंघाचे ना. उदयजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्यासह प्रशासनातील विविध अधिकारी, वाडिया हॉस्पिटलचा समूह व वैद्यकीय मदत कक्षाचा संपूर्ण समूह यावेळी उपस्थित होता. यापूर्वी अशा प्रकारे लहान बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मोफत करण्याचे शिबिर मुख्यमंत्री ना.शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये झाले होते. त्यानंतर द्वितीय वेळेला ते ना. सामंत साहेबांच्या आग्रहाखातर रत्नागिरीमध्ये पार पडले. यापुढे देखील अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमध्ये खंड पडू देऊ नका, हे देखील मंत्री महोदयांनी आवर्जून सांगितले.