आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या प्रियजनांमध्ये जुळी मुलं झाल्याचं ऐकलं असेल. कधी कधी एखाद्या स्त्रीला तीन मुलं झाल्याचदेखील तुम्ही ऐकल असेल, पण एकाच वेळेला एखाद्या स्त्रीने दहा मुलांना जन्म दिल्याचे आपण क्वचितच ऐकल असाल. दक्षिण आफ्रिका मध्ये अशीच एक अचंबित करण्यासाठी गोष्ट घडून आलेली आहे जाने एक विश्व रेकॉर्ड बनला गेला आहे.
गोसेम थामॅरा या दक्षिण आफ्रिकेमधील एका स्त्रीने एकाच वेळेला दहा मुलांना जन्म देऊन विश्व रेकॉर्ड केला आहे. गोसेम चे पती तिबोहो यांनी संगितले की ७ जून रोजी गोसेम हिला दवाखान्यामद्धे दाखल केले होते, आम्हाला याची कल्पना होती की ८ मूल तिच्या गर्भामद्धे वाढत आहेत, पण सिजेरियन शस्त्रक्रिया केल्यावर आम्हाला आणि डॉक्टरांना जे समजलं ते अचंभीत करण्यासारखं होत. गोसेम हिने त्यावेळेस १० मुलांना जन्म दिला. या दहा मुलांमध्ये ७ मुलगे आणि ३ मुली आहेत. दक्षिण आफ्रिकेतिल प्रीटोरीआ या शहरामद्धे ही घटना घडली.
गोसेम ही ३७ वर्षीय महिला आहे. याआधी ती एका जुळ्या मुलांची आई देखील आहे. परवाच्या घटनेमुळे ती आता १२ मुलांची माता झाली आहे. डॉक्टर सांगतात एकाच वेळेला १० मुलांची गर्भधारणा करण आणि ती सामावून नेण हे खूप कठीण काम आहे. गोसेम हिची गर्भधारणा पुर्णपणे नैसर्गिक होती. सध्यास्थितीमद्धे १० बाळे आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप असल्याचे डॉक्टर यांनी संगितले.