22.8 C
Ratnagiri
Wednesday, December 17, 2025

गुहागर किनारा ‘ब्लू फ्लॅग’च्या अंतिम टप्प्यात…

गुहागर आयोजित किनारी वाळूशिल्प प्रदर्शनावेळी विचारे आणि...

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची गैरसाय लांजा नगरपंचायतीला निवेदन

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी संदर्भात भाजपचे...

एलईडी मासेमारी करणाऱ्या २ नौका गस्ती पथकाने पकडल्या

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी...
HomeKokanताम्हाणी घाटात अपघात, डोंगरावरून कोसळलेली दरड डोक्यात पडून महिला ठार

ताम्हाणी घाटात अपघात, डोंगरावरून कोसळलेली दरड डोक्यात पडून महिला ठार

दगड धावत्या कारवरील सनरुफवर पडून विचित्र अपघात झाला.

माणगाव-पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावाजवळ गुरुवारी दरड कोसळली. त्यातील दगड धावत्या कारवरील सनरुफवर पडून विचित्र अपघात झाला. यामुळे कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुणे येथून माणगावच्या दिशेने एक कुटुंब कारने प्रवास करत होतं. ही कार ताम्हिणी घाटातून जात असताना अचानक डोंगरावरून दरड कोसळली. दरडीचे मोठे दगड थेट धावत्या कारवर येऊन पडले, आणि सनरुफ फुटून मोठा दगड कारमध्ये बसलेल्या स्नेहल गुजराती (वय ४३) या महिलेच्या डोक्यावर पडला. त्यामुळे स्नेहल गुजराती गंभीर जखमी झाल्या.

अपघात होताच स्नेहल गुजराती यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा कारमध्येच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. माणगाव पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular