26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeChiplunमहिलेच्या मर्डरने चिपळूण हादरले! मृतदेह जाळण्याचा प्रयत्न…

महिलेच्या मर्डरने चिपळूण हादरले! मृतदेह जाळण्याचा प्रयत्न…

सामायिक जमिनीवरून हरचिरकर कुटुंबात गेले काही महिने वाद सुरू होते.

चिपळूण तालुक्यातील वालोपे येथील लक्ष्मी अनंत हरचिरकर या ७० वर्षीय वृद्धेला अत्यंत अमानुषपणे मारहाण करून शेतात फरफटत नेत निर्घृणपणे ठार मारून शेतात मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला आहे. जमिनीच्या वादातून हा खून करण्यात आला असून तो नात्यातील जवळच्याच व्यक्तीने केला असल्याच संशय वृद्धेच्या मुलाने व्यक्त केला आहे. पोलीस संशयिताच्या मागावर गेले आहेत.

यासंदर्भात घटनास्थळावरून तसेच मृत महिलेच्या मुलांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी हरचिरकर ही वृद्ध महिला आपल्या २ मुलांसह वालोपे वरचीवाडी येथे राहत होती. सामायिक जमिनीवरून हरचिरकर कुटुंबात गेले काही महिने वाद सुरू होते. अनेकवेळा या विषयावरून भांडणे देखील होत होती. परंतु जमिनीचा हा वाद इतका पराकोटीला जाईल याची कल्पना कोणालाच नव्हती. अशा परिस्थितीत लक्ष्मी हरचिरकर या दोनच दिवसापूर्वी पंढरपूर यात्रा करून आल्या होत्या.

सकाळी शेतात गेली पण.. – लक्ष्मी हरचिरकर शुक्रवारी सकाळी नेहम ीप्रमाणे शेतात गेली. तेव्हा छोटा मुलगा घरात होता. परंतु दुपारी २ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे मुलाने शोधाशोध सुरू केली. आजूबाजुला थांगपत्ता न लागल्याने मुलाने थेट शेतात धाव घेतली. परंतु शेतात देखील तो दिसून आली नाही म्हणून त्याने आईला हाका मारण्यास सुरुवात केली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर हवालदिल झालेल्या मुलाने शेतातच शोधाशोध सुरू केली आणि भयानक वास्तव समोर आले.

बाजूच्या शेतातून धूर – शेतात आजूबाजूला शोध घेत असतानाच बाजूच्या शेतातुन धूर येत असल्याचे त्या तरुणाच्या निदर्शनास आले. धूर कसला हे पाहण्यासाठी तो त्याठिकाणी पोहचला आणि समोरचे दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकरली. शेतात चक्क मृतदेह जळत असल्याचे आणि त्या मृतदेहाच्या अंगावर आपल्या आईची साडी दिसत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले तेंव्हा जणू त्याचा थरकाप उडाला. प्रकरण नेमके काय? हेच त्याच्या लक्षात येत नव्हते. अखेर त्याने धीर करून गावातील लोकांना बोलावून घेतले.

पोलीस पाटील, सरपंच धावले – गावचे पोलीस पाटील भालचंद्र कदम, तसेच सरपंच अनिशा काजवे यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. समोरचे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. मृतदेह पूर्ण जळाला नव्हता तर काही अवशेष दिसून येत होते. मृत व्यक्तीची साडी देखील दिसून येत होती. त्यामुळे हा लक्ष्मी हरचिरकर या महिलेचाच मृतदेह असल्याची खात्री त्यांना झाली आणि थेट चिपळूण पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलीस पथक घटनास्थळी – पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे पोलिसांचे पथक घेऊन घटनास्थळी पोहचले. पाठोपाठ डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने हे देखील त्याठिकाणी पोहचले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. अनेक महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्यासमोर आले. त्यामुळे पोलिसांनी देखील तातडीने कार्यवाहीला सुरुवात केली.

मारहाण करून फरफटत नेले – सर्व ग्रामस्थांच्या व मृत महिलेच्या मुलांसमोर पोलिसांनी जेव्हा परिसराची पाहणी केली तेव्हा अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले. या महिलेला प्रथम मारहाण करण्यात आली. मारहाणीत निघालेले रक्त एका ठिकाणी पडलेले दिसून आले. त्यानंतर बाजूच्या शेतापर्यंत चक्क अमानुषपणे फरफटत घेऊन गेल्याच्या खुणा पोलिसांना स्पष्टपणे शेतात दिसून येत होत्या. त्यामुळे वृद्धेला प्रथम बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये तिचा जीव गेला असावा असा संशय पोलिसांचा निर्माण झाला आहे.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न? – बेदम मारहाण करून ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संशयिताने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. हा खूनच असल्याच्या निर्णयापर्यंत पोलीस पोहचले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी ठाण मांडून होते व जाबजबाब नोंदवत होते.

तो बघत होता…. अन सटकला! – परिसरात सुरू असलेल्या चर्चे चा कानोसा घेतला असता ज्याने हे कृत्य केले ती व्यक्ती जवळपास सतत फिरत होती. एका टपरीवर त्याने चहाचा घोट घेतला. मृतदेह पूर्ण जळाला की नाही? याबद्दल तो खात्री करत असावा. परंतु ज्यावेळी पोलीस पथक त्याठिकाणी दाखल झाले. त्यावेळी मात्र त्याने गुपचूप पळ काढल्याची उघड चर्चा परिसरात सुरू होती.

मुलांकडून थेट संशय – मयत लक्ष्मी हिच्या मुलाने पोलिसांकडे या संदर्भात स्पष्टपणे संशय व्यक्त केला असून आमचे जमिनीचे वाद असून त्यातूनच हा खून करण्यात आला आहे.तो व्यक्ती आमच्या जवळचा असून त्याचे नाव देखील या मुलाने पोलिसांना सांगितल्यांची माहिती मिळत आहे. त्यामुळे जवळच्या व्यक्तीने हे अमानुष कृत्य केले असल्याचे समोर आले असून पोलिसांनी संशयित व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular