युवासेना रत्नागिरी विधानसभा क्षेत्रांची आढावा बैठक गुरुवारी पार पडली. शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला युवासेना कार्यकारणी सदस्य सुप्रदा कतिपकर, युवासेना उपसचिव रेणुका विचारे, विभागीय सचिव मंदार शिरसाठ, जिल्हा विस्तारक अतुल लोटणकर यांच्यासह जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, उपजिल्हा युवाधिकारी हेमंत खातू, तालुका अधिकारी प्रसाद सावंत उपस्थित होते. रत्नागिरी विधानसभा क्षेत्रातील जिल्हापरिषद गटनिहाय आढावा घेण्यात आला. तसेच शहरातील प्रभाग नुसार चर्चा करण्यात आली.
एकंदरीत या आढावा बैठकीत रत्नागिरी विधानसभा युवासेनेच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करताना असेच सक्रीय रहा, तुम्हाला काही गरज लागल्यास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या या कामगिरीचा आढावा आम्ही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे त्यांचेही लक्ष आपणा सर्वांवर असणार आहे, असे सांगतानाच संघटना अडचणीत असतानाही ज्या पद्धतीने युवासेनेचा झंझावात कायम राखणाऱ्या तालुका अधिकारी प्रसाद सावंत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
कॉलेज यूनिटच्या कामगिरीवर ही चर्चा करण्यात आली आणि त्यावरही समाधान व्यक्त करण्यत आले. यावेळी युवती सेनेच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. यावेळी तालुका समन्वयक साईनाथ जाधव, उपतालुका अधिकारी आशिष भालेकर, रोहीत साळवी, शहर युवाधिकारी आशिष चव्हाण, कॉलेज तालुका यूनिट अधिकारी पारस साखरे, उपतालुका यूनिट अधिकारी नुपूर आचरेकर यांच्यासह विभाग अधिकारी, उपविभाग अधिकारी शाखाधिकारी, उपशहर अधिकारी यांच्यासह कॉलेज यूनिट सदस्य आणि युवासैनिक उपस्थित होते.