28.7 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriसमुद्रात ४० फूट आत बंधारा उभारण्याचा निर्णय मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला गती

समुद्रात ४० फूट आत बंधारा उभारण्याचा निर्णय मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला गती

मरिन ड्राईव्हप्रमाणे हा बंधारा बांधण्याचा आराखडा तयार केला

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे सुमारे १२०० मीटरच्या टप्प्याचे काम गतिने सुरू झाले आहे. परंतु हा बंधारा स्थानिकांच्या सात-बारा उताऱ्यावर येत असल्याच्या तक्रारी होत्या. याचा विचार करून पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी त्यावर तोडगा म्हणून हा बंधारा ४० फुट आत समुद्रात बांधण्यात येत असून त्यावर रस्ता होणार आहे. त्यामुळे आलाव्यापासून ते अगदी पांढरा समुद्रपर्यंत स्थानिकांना समुद्रांच्या उधाणापासून होणार धोका कमी झाला असून किनाऱ्याचे संरक्षण होणार आहे. सुमारे १६० कोटी रूपयांचे हे काम आहे. तर बसरा स्टार जहाज किनाऱ्यावर अडकल्यामुळे ३०० मीटरच्या बंधाऱ्याचे काम खोळंबले आहे.

बंधाऱ्याची चाळण – दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. उधाणाच्या भरतीमुळे वारंवार या बंधाऱ्याची चाळण होते. अजस्र लाटा बंधाऱ्या गिळंकृत करून मानवी वस्तीमध्ये समुद्राचे पाणी शिरते. यामुळे नागरिक भयभीत होऊन पावसाळ्यात त्यांना रात्र जागून काढावी लागते. परंतु आता सुमारे साडे तीन किमीच्या या धुप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. तीन वर्षांमध्ये एकुण ३ हजार १५० मीटर च्या कामापैकी १ हजार ९५० मीटर काम झाले आहे.

१२०० मीटरचा टप्पा – जयहिंद चौक ते पांढरा समुद्रा असा १२०० मीटरचा टप्पा राहिला होता. त्याचे काम देखील सुरू झाले आहे. मुळात समुद्राचे एवढे अतिक्रमण झाले आहे. अनेकांच्या सात-बारावर तो आला असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेकांच्या माडाच्या बागा, संरक्षक भिंती समुद्राने गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे हा धुपप्रतिबंधक बंधारा समुद्रातुनच व्हावा, अशी स्थानिक ग्राम स्थांची मागणी होती. त्याबाबत त्यांनी आपली कैफियत पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे मांडली होती.

समुद्रातून बांधणार – पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी याचा विचार करून ठेकेदाराशी चर्चा करून मरिन ड्राईव्हप्रमाणे हा बंधारा बांधण्याचा आराखडा तयार केला या बंधाऱ्यामुळे संपुर्ण मिऱ्यावासीयांचे संरक्षण होईल आणि पर्यटन वाढीलाही मदत होईल, असा त्यांचा उद्देश होता. त्याअनुषंगाने त्यांनी बंधाऱ्याची रचना केली. बंधारा ४० फुट समुद्रातुन बांधण्यात आला आहे. त्यावर चांगला रस्ता होणार असून पर्यटन देखील वाढणार आहे. जयहिंद चौक ते पांढरा असे १२०० मीटरच्या बंधाऱ्याचे रखडलेले काम सुरू झाले आहे. हा बंधारा पुर्णपणे समुद्रातुन बांधण्यात येत आहे. ४० फुट तो समुद्रात घेतल्याने स्थानिकांच्या सात-बारावरील समुद्राचे अतिक्रमण आता थांबले आहे. बसरा स्टार जहाज काढल्यास उर्वरित ३०० मीटरच्या टप्प्याचेही काम सुरू होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular