परशुराम घाटात वाहून गेलेला मातीचा भराव पुन्हा करून त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचे काम अखेर सुरू झाले आहे. ५ महिन्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे; मात्र कामासाठीचे गुणवत्तापूर्वक आराखडा अजून मंजूर झाले नाही. आयआयटी मुंबईकडून ते मिळणार आहे. तत्पूर्वी प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम १५ वर्षे सुरू आहे. मागील ३ वर्षांपासून परशुराम घाटातील रस्ता बनवण्याचे काम दोन टप्प्यात सुरू आहेः सवतसडा धबधब्यापर्यंतचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूणच्या देखरेखीखाली तर त्याचा पुढील भाग महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सवतसड़ा धबधब्यापर्यंतचा रस्ता सुरळीत झाला, मात्र त्याचा पुढील भाग तयार करताना बऱ्यापैकी. डोंगरकटाई करून दुसऱ्या बाजूला मातीचा भराव टाकला आहे. मातीच्या भरावावर संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. यातील एक भिंत सप्टेंबर २०२४ मध्ये मध्यरात्री कोसळली तसेच मातीचा भरावही वाहून गेला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले.
महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने धोकादायक ठिकाणी उपाययोजना केल्या तसेच धोकादायक मार्गावरील वाहतूक बंद केली. त्यामुळे मागील ५ महिन्यात परशुराम घाटातील धोकादायक ठिकाणी एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. अपघात झाल्यानंतर महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनी आणि मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी घटनेची पाहणी केली. नव्याने काम करताना नवीन आराखडा तयार करून त्याची केंद्र शासनाकडून मंजुरी घेऊन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळ्यानंतर तातडीने हे काम सुरू केले जाणार होते; मात्र संपूर्ण महामार्गाच्या कालात दिरंगाई होत आहे. त्याच पडतीने परशुराम घाटातील संरक्षण भिंत बांधण्यासाठीसुद्धा उशिराने सुरवात झाली आहे. परशुराम घाटात कोसळलेली भिंत बांधण्यासाठी नवीन आराखडा आयआयटी मुंबईकडून तयार करून घेतला आहे. तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाणार आहे.