वाशिष्ठीचा गाळ हटविण्यासाठी युद्धपातळीवर काम

109
Work is going on for 18 hours round the clock to shift the sludge

पावसाळ्यात शहराला दिलासा मिळावा, शहराला पुराचा फटका बसू नये. शहरातील गोवळकोट परिसरातील वाशिष्ठी नदीतून काढलेला गाळ पावसाळ्यापूर्वी दुसरीकडे फाउंडेशनकडून हलविण्यासाठी नाम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नामची यंत्रणा दिवस-रात्र तब्बल १८ तास कामाला लागली आहे.जलसंपदा विभाग, प्रशासन व चिपळूण बचाव समिती यांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाऊंडेशनकडून वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील शिल्लक गाळ उपसा व बेटे काढण्याचे काम सुरू आहे. गोवळकोट धक्का परिसरात काढलेला गाळ वाहतूक करण्यासाठी तेथेच टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत आहे. यामुळे या ठिकाणी काढलेला गाळ पावसाळ्यापूर्वी नदीबाहेर टाकण्यासाठी नाम फाऊंडेशनकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

सध्या या भागात गाळ शिफ्टींग करण्यासाठी १८ तास अहोरात्र काम सुरू आहे. या कामासाठी नामने वाशिष्ठी नदीपात्रात ४ पोकलेन आणि १५ डंपर अशी यंत्रणा कार्यरत ठेवली आहे. वाशिष्ठी व शिवनदीतील गतवर्षी काढलेला गाळ शहरातील विविध शासकीय जागेत टाकण्यात आला. खोलगट असलेल्या या जागांमध्ये भराव करून त्याचे सपाटीकरण करण्यात आले. याशिवाय गोवळकोट येथील मैदानातही भराव करून तो विकसित करण्यात आला. या शासकीय जागांचे सपाटीकरण झाल्याने शासनाचा कोट्यवधीचा खर्च वाचला होता.

गाळ टाकण्यासाठी जागेचा शोध – गाळ टाकण्यास शहरात पूररेषेबाहेर मुबलक अशा जमिनी नसल्याचे चित्र आहे. जलसंपदाच्या नियोजनात आणि महसूल विभाग व नगरपालिकेने गाळ टाकण्यासाठी पुरेशा जागा उपलब्ध करून दिल्यास एक महिन्याच्या अगोदर हे काम मार्गी लागेल, अशी आशा नाम फाउंडेशकडून वर्तवली जात आहे.