27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriसीआरझेडची मान्यता नसल्याने जिल्ह्यातील हजारो कोटींच्या कामांना खो

सीआरझेडची मान्यता नसल्याने जिल्ह्यातील हजारो कोटींच्या कामांना खो

कामांना मंजूरी मिळणे मुश्कील बनले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मेरीटाईम बोर्ड अंतर्गत सुमारे ३० ते ३५ काम ांना सीआरझेडची मान्यता नसल्याने सुमारे ८०० ते ९०० कोटींपेक्षा अधिक कामांना ब्रेकच लागल्याने या कामांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक महत्वाची कामे आमदार, मंत्री यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात येत आहेत. या कामांना सीआरझेडची मान्यता असावी लागते. ही मान्यता घेण्यास काही वर्षे जातात. रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः रत्नागिरीतील भगवती क्रूझ टर्मिनल, राजीवडा बंधारा, जेट्टींचे ग्रोयन बंधारे यांची कामे मेरीटाईम बोर्डामार्फत केली जातात. त्यासाठी विहीत पूर्तता करावी लागते. मात्र या कामांना ब्रेक लागला आहे. भगवती बंदरातून सुमारे ३०० कोटींचे भगवतीक्क्रुझ टर्मिनल, राजीवडा येथील ८०० मीटरचा धूप प्रतिबंधक बंधारा, पतन विभागाचे ४०० कोटीपेक्षा अधिक खर्चाचे धूप प्रतिबंधक बंधारे अशी सुमारे ८०० ते ९०० कोटी खर्चाच्या कामांना सीआरझेडमुळे ब्रेक लागला आहे.

सीआरझेडच्या समितीची मुदत संपल्याने ही नविन समिती गठीत केली गेली नाही. त्यामुळे कामांना मंजूरी मिळणे मुश्कील बनले आहे. ही समिती गठीत न झाल्यास या कामांचे नविन अंदाजपत्रक बनवावे लागेल. परिणामी त्याचे बजेटही वाढेल. त्यामुळे ही समि ती तात्काळ गठीत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान सीआरझेडच्या नियमांची उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक समुद्रकिनारच्या खाडीकिनारी दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामे होत आहेत. याकडे लक्ष कां दिले जात नाही? असा संतप्त सवाल केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular