26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeIndiaजगातील एकमेव शाकाहारी मगरीचा मृत्यू

जगातील एकमेव शाकाहारी मगरीचा मृत्यू

हिंदू रितीरिवाजांनुसार पुजाऱ्यांनी मगरीची शेवटची यात्रा काढली. परिसराजवळच त्याला दफन करण्यात आले.

जगातील एकमेव शाकाहारी मगरीचा केरळमध्ये मृत्यू झाला. कासारगोड जिल्ह्यातील श्री अनंत पद्मनाभस्वामी मंदिराच्या तलावात ही मगर ७० वर्षांपासून वास्तव्य करत होती. अनंतपुरा तलावात मुक्काम करून मंदिर परिसर पहारा देत असे. हिंदू रितीरिवाजांनुसार पुजाऱ्यांनी मगरीची शेवटची यात्रा काढली. परिसराजवळच त्याला दफन करण्यात आले.

मगरीला प्रेमाने बाबिया म्हणत. मंदिरात दिलेला भात-गुळाचा प्रसाद ती खात असे. बाबिया शनिवारपासून बेपत्ता होती. रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास तीचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आला. यानंतर मंदिर प्रशासनाने पशुसंवर्धन विभाग आणि पोलिसांना याची माहिती दिली.

मगर पूर्णपणे शाकाहारी होती आणि तलावातील मासे किंवा इतर प्राणी खात नसल्याचा पुजाऱ्यांचा  दावा आहे. बाबिया गुहेत राहत होती. ती दिवसातून दोनदा गुहेतून मंदिरात जायची आणि थोडे चालल्यावर पुन्हा आतमध्ये जायची. मगरी फक्त मंदिरात दिलेला प्रसाद खात असे. त्याला शिजवलेला भात आणि गूळ खूप आवडायचा. देवाच्या दर्शनाशिवाय बाबियाचे दर्शन घेण्यासाठी अनेक लोक मंदिरात येत असत आणि स्वतःच्या हाताने भात खाऊ घालत असत. मगरीने आजपर्यंत कोणालाही इजा केली नसल्याचा लोकांचा दावा आहे.

अनेक राजकारणी आणि शेकडो लोक मगरीला शेवटच्या वेळी पाहण्यासाठी आले होते. गर्दी वाढू लागल्यावर बाबियाचा मृतदेह तलावातून काढून मोकळ्या जागेत ठेवण्यात आला. बाबियाला पाहण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजेही पोहोचल्या. श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले की, मगरीचे वास्तव्य ७० वर्षे मंदिरात होते. देव तिला मोक्ष देवो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन म्हणाले की, लाखो भाविकांनी देवाची प्रतिमा पाहून मगरीचे दर्शन घेतले. बाबियाला भावपूर्ण श्रद्धांजली.

RELATED ARTICLES

Most Popular