23.5 C
Ratnagiri
Monday, November 25, 2024

सर्वाधिक 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय सामंत विजयी

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) :- 266 रत्नागिरी...

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriखड्डे चुकवा, बक्षीस मिळवा ! एक अनोखी स्पर्धा

खड्डे चुकवा, बक्षीस मिळवा ! एक अनोखी स्पर्धा

रत्नागिरी मधील खोदलेले रस्ते आणि सगळीकडे पावसामुळे झालेली वाताहत लक्षात घेता, राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक काँग्रेस कडुन एक अनोखी स्पर्धा खास अती सहनशील रत्नागिरीकरांसाठी घेण्यात आली. “खड्डे चुकवा, बक्षीस मिळवा” असे अनोखे आंदोलन राम आळी ते राधाकृष्ण नाका बाजारपेठ येथे करण्यात आले.

रत्नागिरी शहरातील सर्व रस्त्यांचे पूर्णपणे वाट लागली असून, रस्त्याच्या खड्ड्यातून मार्ग काढत दुचाकी चालवत नेणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखेच आहे. खड्डेमय रत्नागिरीवरून अनेक मेमेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अशा सहनशील रत्नागिरीकरांसाठी गुलाब पुष्प देण्यात आली त्या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्री बंटी सदानंद वणजू, शहर विध्यार्थी अध्यक्ष साईजीत शिवलकर, प्रथमेश कांबळे, सौरभ वायंगणकर, सुरज दळवी, निकिता वाघधरे, अक्षय मजगावकर, भुषण पवार, श्रवण टकेल आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर अनोख्या स्पर्धेचा एकच मुळ उद्देश होता कि, नागरिकाना खड्ड्यामध्ये असणाऱ्या रस्त्यांना चुकवून पुढे जाणे, अशक्यप्राय बनले आहे. त्यामुळे रस्त्यावर असंख्य असलेले खड्डे चुकवणे शक्य होणार नाही, याची आयोजकांना खात्री होती. एकतर रस्त्याभर असलेले खड्डे आणि त्यात आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीचे रुपांतर विविध नद्यांमध्ये झाले आहे. पालिकेने गटारांचा सर्व्हे वेळेत न केल्याने आज रत्नागिरीची अशी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील नागरिकांना खड्डे चुकवता न आल्याने, पुन्हा अशा नगरपालिकेतील भ्रष्ट सत्ताधार्यांना पुन्हा निवडून न देण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेसकडुन रत्नागिरीकरांना करण्यात आले आहे. जेणेकरून पूर्वी ज्या रत्नागिरीची तुलना स्वच्छ, सुंदर रत्नागिरी अशी व्हायची, तिचे आजच्या परीस्ठीतीसारखे भयावह रुप पुन्हा रत्नागिरीकरांना अनुभवायला लागू नये.

RELATED ARTICLES

Most Popular