25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeRatnagiriदहा हजारांचा दंड उतरवणार झिंग - नवा वाहतूक अधिनियम

दहा हजारांचा दंड उतरवणार झिंग – नवा वाहतूक अधिनियम

नव्या वाहतूक अधिनियमाने अनेक वाहनधारकांची झोप उडवली आहे. दंडाच्या रकमेमध्ये मोठी वाढ केल्याने वाहतूक नियम पाळावेच लागत आहेत.

मद्यपान करून वाहन चालवल्यास अपघात होऊन त्यात स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अपघातावेळी वाहनचालकाने मद्यपान केल्याचे पुढे आल्यास त्याला दहा हजारांचा दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. ही कारवाई मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची झिंग उतरवणारी आहे. नव्या वाहतूक अधिनियमाने अनेक वाहनधारकांची झोप उडवली आहे. दंडाच्या रकमेमध्ये मोठी वाढ केल्याने वाहतूक नियम पाळावेच लागत आहेत.

बहुतांश वाहनधारक खिशाला चाट नको म्हणून हे नियम पाळतात; परंतु अनेक अतिउत्साही आणि मद्यपानाची सवय असणारे या नियमांकडे कानाडोळा करतात; परंतु आता तेही चूक न पेलवणारी आहे. कारण मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांकडून अनेकदा जीवघेणे अपघात होतात. काही तर स्वतःच या अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यामुळे मार्गावरील अपघात टाळण्यासाठी मद्यपान करून वाहन चालवल्यास अशांना १० हजार रुपयांचा दंड किंवा सहा महिन्यांचा कारावास, अशा दोन्हीही शिक्षा भोगाव्या लागणार आहेत.

त्यामुळे अनेक मद्यपींची झिंग या दंडामुळे आणि कारावासामुळे उतरली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. वाहनचालकांची तपासणी ब्लड अल्कोहोल कन्टेंट टेस्ट ब्रेथलायझरच्या मदतीने घेतली जाते. त्या चालकाने अल्कोहोलचे सेवन केल्याचे आढळल्यास कारवाई होते. वाहन चालवताना मद्यपान करून वाहन चालवल्यास अपघात घडून वाहनचालकासह इतरांच्या मृत्यूला किंवा गंभीर जखमी करण्याला तो वाहनचालक जबाबदार असतो. त्यामुळे मद्यपान केल्याचे आढळल्यास त्याचे परमिटही रद्द होऊ शकते.

RELATED ARTICLES

Most Popular