27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

दोन जिल्ह्यांसाठी वन्य प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णवाहिका दाखल

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाच्या खारफुटी...

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...
HomeMaharashtraयाकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणावर, अखेर आदित्य ठाकरेंचा पलटवार

याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणावर, अखेर आदित्य ठाकरेंचा पलटवार

भाजप सरकारने मेमनला दहशतवाद्यासारखी वागणूक का दिली नाही. मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात का दिला...!

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन याच्या कबरीच्या कोरोना काळात झालेल्या सुशोभीकरणास महाविकास आघाडी सरकारची अलिखित परवानगी होती, असा आरोप करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली.

संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दहशतवादी विचारांना कोणी संरक्षण देत असेल तर असे लोक समोर आले आहेत, देवेंद्र फडणवीसांनी या संबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मी या निर्णयाचं स्वागत करतो असे मुनगंटीवार म्हणणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच याला जो कोणी जबाबदार असेल, त्याची दखल घेत दोषींवरह कडक कारवाई केली जाईल. असा इशारा दिला.

या प्रकरणी मुंबई पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात चौकशी होणार आहे. एलटी मार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी देखील तपास करत आहेत. सोबतच वक्फ बोर्ड, धर्मादाय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडून याबाबत माहिती घेण्यात येत आहे. या कबरीचे सुशोभिकरण कोणी केले याचा शोध घेतला जाणार असून त्यावर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

याकूब मेमनच्या कबरीवरून भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. परंतु, आता आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मेमनची कबर असलेली दफनभूमी ही खासगी ट्रस्टची आहे. मेमनचा दफनविधी झाला तेव्हा राज्यात भाजपचे सरकार होते. त्या वेळी दहशतवाद्याच्या दफनविधीला सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. याउलट देशात व राज्यात पूर्वीच्या सरकारने कसाब व अफजल गुरू या दहशतवाद्यांना फाशी दिल्यानंतर त्यांचे मृतदेह अज्ञातस्थळी दफन केले. कुटुंबीयांना दफनविधीसाठी दिले नव्हते. भाजप सरकारने मेमनला दहशतवाद्यासारखी वागणूक का दिली नाही. मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात का दिला…!, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

RELATED ARTICLES

Most Popular