28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriओम आणि स्वीटूचे लग्न अखेर रत्नागिरीमध्ये संपन्न, पहा १९ तारखेचा महाएपीसोड

ओम आणि स्वीटूचे लग्न अखेर रत्नागिरीमध्ये संपन्न, पहा १९ तारखेचा महाएपीसोड

मराठी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमध्ये आलेल्या ट्वीस्ट बाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. फारच कमी कालावधीमध्ये या मालिकेने प्रेक्षकांची मनावर राज्य केले आहे. मालिकेची इतर मालिकांपेक्षा वेगळे कथानक, स्वीटू आणि ओमची वेगळी जोडी आणि प्रेम कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता याच प्रेमाचे रुपांतर लग्नामध्ये झाले आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचा हा लग्नसोहळा रत्नागिरीमधील जयगड येथील जय विनायक मंदिर येथे जोशात पार पडला.

कोकणाच्या सौंदर्याची जगभरात सगळ्यांनाच भुरळ पडलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विविध मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण होताना दिसते. सध्या या मालिकेचे शूटींग रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे सुरु आहे. जयगड येथील प्रसिध्द जय विनायक मंदिर आणि त्याच्या सभोवताली असलेले सुंदर आकर्षक असे बगीचा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे शूटींग सध्या तिथे सुरु आहे. त्या ठिकाणी मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित आहेत.

ओमची बहिण मालविका हिने सुद्धा या दोघांच्या लग्नाला होकार दिला असून तीसुद्धा ओम आणि स्वीटूच्या लग्नाला हजर आहे. मालिकेमध्ये पुढे काय होणार? ओम आणि स्वीटूच खरच लग्न होणार का?  या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना १९ तारखेच्या महा एपीसोडमध्ये मिळणार आह़े. या चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा सुद्धा वापर करण्यात आला आहे.

मालविकाने अनेक अडथळे आणल्यानंतरही आता पुन्हा एकदा ओम आणि स्वीटू यांच्यातील दुरावा कमी होताना दिसत आहे. मात्र मालविका आणि मोहितच्या कट कारस्थानं उघड करून, अचानक आलेल्या ट्विस्टमुळे पुन्हा या दोघांचे लग्न होताना प्रेक्षकांना दिसणार आहे. मालविका पुन्हा काय कारस्थान रचेल कि चांगल्या मनाने त्यांना स्वीकारेल याबाबत अजूनही शंकाच आहे. पुढे मालिका काय वळण घेणार?  हे लवकरचं कळेल.

RELATED ARTICLES

Most Popular