24.8 C
Ratnagiri
Wednesday, November 12, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraआता सोन्याप्रमाणे चांदी पण तारण ठेवून कर्ज घेता येणार

आता सोन्याप्रमाणे चांदी पण तारण ठेवून कर्ज घेता येणार

या नवीन नियमांनुसार १ एप्रिल २०२६ पासून सर्व बँका लोन घेऊ शकतात.

आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आता सोनंप्रमाणे चांदी पण तारण ठेवून कर्ज घेता येणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक मदतीचा नवा मार्ग सर्वसामान्यांसमोर खुला होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत किंवा काही गरजेसाठी लोकांना पैशांची गरज पडते. अशावेळी घरातील महिलांचे धन म्हणजे सोनं बँकांकडे तारण ठेवून कर्ज घेतलं जातं. गेल्या काही महिन्यांपासून सोनं महाग झालं आहे. त्यासोबत चांदीही भाव खात आहे. महिलांकडे सोन्यासोबत चांदीही मोठ्या प्रमाणात आहे. अशात सोन्याप्रमाणेच चांदीवरही कर्ज घेता येतं का? असा प्रश्न कायम सर्वसामान्यांना पडतो. बँक ऑफ इंडियाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांमधून याबद्दल सांगण्यात आलं आहे. या नवीन नियमांनुसार १ एप्रिल २०२६ पासून सर्व बँका आणि नियमनाधीन कर्जदाते आता सोनेप्रमाणे चांदीवरही लोन घेऊ शकतात. पण चांदीवर लोन घेण्यासाठी आरबीयाने काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत.

बँकांतून चांदीच्या कुठल्या गोष्टींवर कर्ज घेता येणार, ते जाणून घ्या. आरबीआयने सांगितलं की, प्रायमरी गोल्ड किंवा प्रायमरी सिल्वर यांच्या बदल्यात लोन देण्यास परवानगी नसते. तसंच आधीच सोनं किंवा चांदीवर कर्ज घेतलं असेल तर त्यावर पुन्हा कर्ज घेता येत नाही. अनेक बँका चांदीला कोलॅटरल म्हणून मान्यता देत नाहीत, त्यामुळे त्या बँका चांदीवर कर्ज देत नाहीत. मात्र काही सहकारी बँका आणि काही नॉन बैंकिंग फायनान्स कंपन्या चांदीच्या तारणावर लोन देतात. आरबीआयच्या नियमानुसार फक्त चांदीचे दागिने आणि नाणी यांच्याविरुद्धच लोन दिले जाऊ शकतं, पण सिल्वर बार, इटीएफ किंवा म्युच्युअल फंड यांच्यावर कर्ज घेता येणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular