26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeKhedखेडमध्ये तरूणाला २४ लाखाचा ऑनलाईन गंडा

खेडमध्ये तरूणाला २४ लाखाचा ऑनलाईन गंडा

फेसबुक अकाऊंट चालवत असताना शेअर मार्केट ट्रेडिंगची लिंक दिसली.

खेड शहरातील एकविरा नगर येथे वास्तव्यास असलेल्या तरूणाची तब्बल २४ लाख ८५ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक न करता कंपनीत ज्यादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणाने पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी उशिरा अज्ञातावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विक्रांत विजय दांडेकर (४०, रा. एकविरा नगर, खेड) यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १९ एप्रिल ते २४ मे या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

तो फेसबुक अकाऊंट चालवत असताना शेअर मार्केट ट्रेडिंगची लिंक दिसली. त्या लिंकवर त्याने क्लिक केले असतां व्हॉटस्अॅप ग्रुपवर जॉईंट होण्यास सांगितले. त्यासाठी अनोळखी इसमाने दोन मोबाईल नंबर पाठवत व्हॉटस्अॅप ग्रुप जॉईंट करण्यास सांगितले. वैयक्तिक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यापेक्षा कंपनीत पैशांची गुंतवणूक करत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार सुरूवातीला गुगल पे द्वारे १० हजार रूपये रक्कम पाठवले. त्यानंतरही सहावेळा खात्यातून रकमा पाठवल्या. तब्बल २४ लाख ८५ हजार रूपये पाठवून देखील जादा रकमेचा परतावा त्याला मिळालेला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणास धक्का बसला.

RELATED ARTICLES

Most Popular