रत्नागिरीतील विक्रम चंद्रशेखर जोशी याने या एम.फार्म पातळीवरील स्पर्धेमध्ये संपुर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. सोसायटी फॉर फार्मासिटीकल डिजोलेशन सायन्स यांच्यामार्फत हि परीक्षा नुकतीच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. नॅशनल इन्सि्टट्युट ऑफ फार्मासिटीकल अँड रिसर्च सेंटर मोहाली, पंजाब व डीआरपीआय यांनी आयोजित केलेल्या यंग सायंटिस्ट अवॉर्ड २०२१ या स्पर्धेमध्ये नावाप्रमाणेच विक्रमने विक्रम रचला आहे. विक्रमच्या या अभूतपूर्व यशामुळे रत्नागिरीचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर झळाळले आहे.
फार्मासिटीकल डिजोलेशन सायन्स व अमेरिकन असोसिएशन ऑफ फार्मासिटीकल सायन्स व असोसिएशन ऑफ फार्मासिटीकल टिचर्स ऑफ इंडिया यांनी डिआरपीआय २०२१ ची फार्मसी विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हि परीक्षा घेण्यात येते. यामध्ये देश पातळीवरील या क्षेत्रातील १०० हून अधिक संस्थांनी व २२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. फार्मसी क्षेत्रामध्ये पीएचडी, एम.फार्मच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
सदर सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण या क्षेत्रातील तज्ञ डॉ. सरंजित सिंग, डॉ. माला मेनन, डॉ. पद्मा देवराजन, डॉ. मंगल नगरसेनकर, डॉ. विनोद शाहा, डॉ. कृष्णप्रिया मोहनराज, डॉ. वर्षा प्रधान, डॉ. उमेश बाणाकर, , डॉ. मेथिअस, डॉ.बेला प्रभाकर, डॉ. सेंड्रा सुरेजडॉ. पिंटु कुमारडे, डॉ. अंबर व्यास, डॉ. सुजाता सावरकर, डॉ. हेमा नायर यांच्या कमिटीने परीक्षण केले. या परीक्षेची उपांत्य फेरी १० व ११ जुलै २०२१ रोजी तर अखिल भारतीय अंतिम फेरी १७ जुलै रोजी पार पडली.
विक्रम हा रत्नागिरी मधील जोशी मेडीकलचे डॉ. चंद्रशेखर जोशी यांचा मुलगा आहे. विक्रमने देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे. देशपातळीवरील यंग सायंटिस्ट पुरस्काराचे स्वरुप रु. ५०,०००/- व प्रशस्तीपत्रक असे आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दलही विक्रमला गौरवण्यात आले आहे. विक्रमच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनपर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.