27.5 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriरत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित राजेंद्र चव्हाण (रा. आंबेशेत, रत्नागिरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानूतन पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना कारवाई संदर्भात आदेश दिले आहेत. गेल्या ८ दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी म ोठ्या प्रमाणात कारवाया सुरू झाल्या आहेत. गुरुवारी रात्री मिरकरवाडा परिसरात शहर पोलिसांचे एक पथक गस्त घालण्याकरिता गेले होते. त्यावेळी पांढरा समुद्र परिसरात पाण्याच्या टाकीजवळ मोकळ्या मैदानात एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. यावेळी पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व तेथून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.

रोहित याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची पिशवी व त्यातून एकूण १४ व ३ मोठ्या प्लास्टीकच्या पारदर्शक पिशव्या मिळून आल्या. पोलिसांनी त्या पिशव्यांची खात्री केली असता त्यामध्ये गांजासदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले व त्याच्याविरोधात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ई) (अ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ही कारवाई पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी निलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक सतिश शिवरकर, पीएसआय शाम आरमाळकर, ए.एस. आय. दिपक साळवी, पो.हवा. अरुण चाळके, अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, अमित पारवे आदींनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular