25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKhedवार्ता विघ्नाचीच! गणेशोत्सवासाठी आलेल्या तरूणाचा विहिरीत बुडून मृत्यू

वार्ता विघ्नाचीच! गणेशोत्सवासाठी आलेल्या तरूणाचा विहिरीत बुडून मृत्यू

आरोग्य केंद्रात करून शवविच्छेदन मृतदेह त्यांच्या नातेवाईक यांच्याकडे ताब्यात देण्यात आला.

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत रत्नागिरी जिल्हयात दुर्घटना ओढावत असून खेडमध्ये विसर्जनादरम्यान एकाचा मृत्यू ओढवला तर लांज्यामध्ये एक तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. या पार्श्वभूमीवर आता चिपळूण येथे गणेशोत्सवासाठी आलेल्या एका तरूणाचा विहिरीत पडून मृत्यू ओढवल्याची बातमी हाती आली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी चिपळूणमधील तळसर गावी आलेला महेश विष्णू कदम हा तरूण विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पोहताना विहिरीत बुडून त्याचा मृत्यू ओढवल्याचे पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. महेश विष्णू कदम (रा. तळसर कदमवाडी, ता. चिपळूण) असे या दुर्दैवी तरूणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, महेश कदम याने आपल्या गावात म्हणजेच तळसरमध्ये दहावीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीसाठी त्याने मुंबई गाठली.

बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये कूक म्हणून ८ वर्ष कामाला होता. शेतकरी कुटुंबातील असलेले तळसर कदमवाडीतील विष्णू कदम यांना तीन मुले असून त्यातील महेश कदम हा लहान मुलगा होता. गणपती सणासाठी दोन दिवसांपूर्वी तो घरी आला होता. त्यांच्या घरात प्रसन्न आनंदी वातावरण होते, शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपल्यावर आई-वडील यांच्याशी गप्पा मारत बसला होता. गावातील हनुमान मंदिरात त्यांच्या बसलेली काही मुले त्यांच्या घरी आली. गेले, यावेळी त्याचे आई वडील यांनी त्याला जाऊ नकोस असे सांगितले. पण मित्रांनी खूप आग्रह केला, त्यामुळे त्यांच्याबरोबर विहिरीत पोहण्यास गेला. विहीर खूप खोल असल्यामुळे महेश कदम यांनी उडी मारली खरी पण तिथेच घात झाला तो बुडाला पाण्यात तो तरंगू लागला. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

सर्वांनी विहिरीकडे धाव घेतली. त्याचा भाऊ योगेश कदम याला ही माहिती मिळताच त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. समोरचे चित्र पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तो टाहो फोडून रडू लागला. त्यानंतर त्याचा मृतदेह गळ टाकून बाहेर काढण्यात आला. सदरची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वा.च्या दरम्यान घडली. शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून शवविच्छेदन मृतदेह त्यांच्या नातेवाईक यांच्याकडे ताब्यात देण्यात आला. मात्र त्याच्या मृत्यूने तळसर ‘कदमवाडीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील करीत आहेत. ऐन गणेशोत्सवात कदम कुटुंबीयांवर दुः खाचा डोंगर कोसळला असून तळसर गाव परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular