25.6 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriगणेशोत्सवासाठी गावी आलेला तरूण पुराच्या पाण्यात बेपत्ता

गणेशोत्सवासाठी गावी आलेला तरूण पुराच्या पाण्यात बेपत्ता

पुराच्या पाण्यात केतन श्रीपत खेगडे हा पाहता पाहता पाण्याच्या मोठ्या लोंढासह वाहून गेला.

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेला एक तरूण वहाळाला आलेल्या पूराच्या पाण्यातून वाहून गेला असून शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही. सरतेशेवटी काळोखामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. ही घटना लांजा तालुक्यातील प्रभानक्ली गोसावीवाडी येथे शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील खेगडे कुटुंबीय हे नोकरी  व्यवसायानिमित्त मुंबई येथे वास्तव्याला असते. गणेशोत्सवानिमित्त ते गावाला आले होते. यापैकी मिलिंद विजय खेगडे (२८ वर्षे) आणि केतन श्रीपत खेगडे (३५ वर्षे) हे दोघे सख्खे चुलत भाऊ असून शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ते प्रभानवल्ली येथील सिद्धेश्वर या देवस्थानच्या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून ते पुन्हा आपल्या घराकडे परतत होते. या देवस्थानाकडे जाण्याच्या ठिकाणी मोठा वहाळ आहे, तो वहाळ ओलांडून पलिकडे जावे लागते. सध्या पडणाऱ्या पावसामुळे या वहाळाला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. हे दोघे भाऊ वहाळातून वाट काढताना अचानकपणे आलेल्या पुराच्या पाण्यात केतन श्रीपत खेगडे हा पाहता पाहता पाण्याच्या मोठ्या लोंढासह वाहून गेला.

पाण्याचा अंदाज आला नाही – शुक्रवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता आणि याचदरम्यान वरील भागात मोठ्या प्रमाणात पडलेला पावसामुळे वहाळाला पूर आला आणि या पुराच्या पाण्याचा अंदाज या दोघांनाही आला नाही.

भाऊ घाबरला – पुराच्या पाण्यात आपला भाऊ केतन हा वाहून गेल्याने मिलींद याला मोठा मानसिक धक्का बसला आहे. याबाबत माहिती कळतात स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे तसेच लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या केतन खेगडे याचा शोध घेण्यासाठी तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. शुक्रवारी दुपारपासूनच युद्ध पातळीवर ही शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत केतन खेगडे याचा शोध लागला नव्हता. शुक्रवारी रात्री उशीरा पर्यंत शोधकार्य सुरू होते.

RELATED ARTICLES

Most Popular