28.4 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

राज आणि माझ्यातील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला : उद्धव ठाकरे

महायुत्ती सरकारने महाराष्ट्रातील शालेय शिक्षणक्रमात पहिलीपासून हिंदी...

बनावट कागदपत्राने वाहने विकणारी टोळी पकडली…

कोल्हापूर टेंबलाईवाडी (ता. करवीर) येथील जुन्या वाहनांची...

चिपळूणात अतिवृष्टीने दरड कोसळली, घरांना धोका

शहरातील खंड भागात शुभम अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला...
HomeRatnagiriपहिल्याच दिवशी १७९० तरुणांचे लसीकरण

पहिल्याच दिवशी १७९० तरुणांचे लसीकरण

रत्नागिरीमधील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, लसीकरण वाढविण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात भर देणे गरजेचे आहे. शासन आपापल्या परीने लसीकरण करण्याकडे भर देत आहेच. शिवसेना आणि युवा सेनेच्या यांच्या प्रयत्नाने आणि घेतलेल्या पुढाकाराने सिएसआरमधून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आले.

बुधवारी सकाळी १० वाजता शहरातील विविध ठिकाणी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या लसीकरण कार्यक्रमानुसार अनेक तरुणांना अद्याप लस मिळाली नव्हती. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी योग्य ती काळजी आणि लसीकरण हेच दोन प्रभावी उपाय असल्याचे अनेक वैद्यकीय तद्यांनी सांगितले आहे. ही गरज ओळखून शिवसेनेच्या वतीने तरुणांचे लसीकरण करण्याचा उपक्रम ना. सामंत यांनी मतदारसंघात राबवला आहे. तालुक्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे वेगवान गतीने लसीकरण होणे गरजेचे आहे, एकही व्यक्ती लसिकरणापासून वंचित राहता कामा नये, हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री नाम. उदय सामंत हे प्रयत्न करत आहेत.

पहिल्याच दिवशी एकूण १७९० तरुण वर्गाचे लसीकरण पार पडले. रत्नागिरी शहरामधील ५ केंद्रांवर हा उपक्रम पार पडला. सलग तीन दिवस हा उपक्रम घेतला जाणार असून, जास्तीत जास्त तरुणांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेनेमार्फत केले आहे. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ना. उदय सामंत, नगराध्यक्ष बंड्या साळवी, खा. विनायक राउत, नगरसेविका स्मितल पावसकर, निमेश नायर आदी उपस्थित होते. शिवसेनेतर्फे राबविण्यात येत असलेला हा नाविन्यपूर्ण आणि गरजेचा उपक्रम संपूर्ण महराष्ट्रासाठी नक्कीच आदर्शवत ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular