29 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeMaharashtraयुट्युबर हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना चिथविल्याप्रकरणी, अखेर अटक

युट्युबर हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना चिथविल्याप्रकरणी, अखेर अटक

विद्यार्थ्य़ांना ऑफलाईन परीक्षा देण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केला होता

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात या मागणीसह शेकडो विद्यार्थी अचानकपणे रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, उस्मानाबादसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेज प्रमाणे ‘हिंदुस्तानी भाऊ’ नावाच्या युट्युबरचे व्हिडिओ पाहून हे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासाठी केलेल्या निदर्शनाला हिंसक वळण लागले होते. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे अनेक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलना प्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस १३ मधील स्पर्धक विकास जयराम पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ, याच्यासह इकरार खान याला देखील मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

विद्यार्थ्य़ांना ऑफलाईन परीक्षा देण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केला होता. ३१ जानेवारी रोजी ऑनलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊवर आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी हिंदुस्तानी भाऊ हजर होता. तसा एक व्हिडीओ समोर आला होता.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की,‘दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला नियोजित  आहेत, त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेऊन आहोत.’  तसेच या प्रकरणाची चौकशी करू आणि विद्यार्थ्यांना चिथावणी देणारा कोण आहे, त्याचा शोध घेऊ, असे शिक्षणमंत्री म्हणाल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular